DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- विलास शिंदोळकर
पोलीस आयुक्तालयाच्या वतीने वाढती सायबर गुन्हेगारी, बाल सुरक्षा, रस्ते सुरक्षा, अमली पदार्थ सेवन व तस्करी विरोधात कारवाई, वाहतूक व्यवस्था त्याबरोबर राज्य सरकारच्या सूचनेनुसार पोलीस आपल्या दारी ही नवीन संकल्पना राबविण्यावर भर देण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी बुधवारी बेळगाव येथे पत्रकार संघाच्या वतीने माहिती व प्रसार खात्याच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या संवाद कार्यक्रमात दिली.
आयोजित संवाद कार्यक्रमात पोलीस आयुक्त भूषण बोरसे म्हणाले की, ” पोलीस आपल्या दारी ही संकल्पना जुन्या बीट पोलिसानुसार सुरू करण्यात आली आहे यापूर्वी पोलीस सायकल वरून आपल्या बीटवर जात होते त्यानंतर मोटर सायकल आली मनुष्यबळ कमी असल्याने पोलीस कर्मचाऱ्यावर बंदोबस्ताचे ताण वाढत आहे. बंदोबस्त, निवडणुका, मोर्चे आंदोलन, यासाठी 70% पोलीस बळ वापरले जात होते तर २० टक्के पोलीस बळ गुन्ह्याचा तपास आणि दहा टक्के वाहतूक रहदारी नियोजनासाठी वापरले जात होते. पोलीस कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा रात्रपाळी करावी लागते.
सायबर गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे, गुन्हेगार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत त्यामुळे सायबर गुन्हे यापुढे कमी होणार नसून ते वाढत जाणार आहेत, अनेक सायबर फसवणुकीचे गुन्हे घडले आहेत.सायबर फसवणूक झाल्यास संबंधितांनी 1923 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधला पाहिजे. पैसे गमावल्या नंतर अनेक जण घाईगडबडीत भीतीपोटी पोलिस स्टेशनला येतात त्यांनी सर्वप्रथम आवश्यक कागदपत्र देणे गरजेचे आहे. संबंधित हेल्पलाइन क्रमांकवर 24 तासात संपर्क साधल्यास गमावलेले पैसे फ्रिज करता येऊ शकतात त्यामुळे सायबर फसवणुकीच्या काळात गोल्डन अवर महत्त्वाचा आहे फसवणूक होऊ नये यासाठी खबरदारी हा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बाल सुरक्षा ही एक मोठी समस्या आहे. अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीवर बापाकडून किंवा भावाकडून घृणास्पद कृती व कृत्य होत आहेत अशावेळी संबंधित्यांचे आपल्या डोकीवरील नियंत्रण सुटलेले असतें, अनेक ठिकाणी अल्पवयीन मुली बाबत अनेक लैंगिक अत्याचारच्या घटना घडत असतात पण समाजात आपली अब्रू जाईल या भीतीने तक्रार करण्यास पुढे येण्याची संख्या कमी आहे.
रस्ते सुरक्षित ही देखील अत्यंत महत्त्वाची आहे मोटरसायकलवर बसताना आपली जबाबदारी ओळखून हेल्मेट परिधान केले पाहिजे, कार चालवीत असताना सीटबेल्ट घालावा हे अंगवळणी करून घेणे गरजेचे आहे.अनेक ठिकाणी अपघात प्रवणक्षेत्र आहे.रात्रीच्या वेळी रस्त्यावर लावण्यात आलेले बॅरिकेट्स मुळे अपघात होऊ नये यासाठी 460 बेरिकेट्स रिफ्लेक्टर्स बसवण्यात आले आहेत. वाहतुकीचे कशा पद्धतीने नियमन करावे या संदर्भात स्थानिक पोलिसांना बेंगलोर वाहतूक पोलिसांकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे.
अमली पदार्थ विरोधात कारवाई सुरूच आहे मात्र आपली मुले अमली पदार्थाच्या आहारी जाऊ नयेत पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवून त्यांची लक्षणे जाणून घेतली पाहिजे. पोलिसांना लवकरच नार्को टेस्ट किट उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ज्या ठिकाणी खुल्या जागेवर नशाबाजी केली जात आहे त्या जागेचे पाहणी करून छापेमारी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.



