नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा तीव्र आंदोलनातून समारोप

⭐सह. दुय्यम निबंधक हनुमंत चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; निलंबनाची मागणी

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹✍️🚨दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- विशाल घोक्षे

पुणे : अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पुणे येथे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनानंतर समितीने अधिकारी रवींद्र बिनवडे, उदयराज चव्हाण व प्रथम पाटील यांच्याकडे निवेदन सादर करून आंदोलनाचा समारोप करण्यात आला.

समितीच्या म्हणण्यानुसार, सहाय्यक दुय्यम निबंधक हनुमंत चव्हाण यांनी गेल्या सहा महिन्यांत तब्बल 20 ते 25 कोटी रुपयांचा प्रचंड घोटाळा केल्याचे तथ्य उजेडात आले आहे. या संदर्भात नोंदणी व मुद्रांक विभागाकडे वेळोवेळी लेखी तक्रारी करूनही आजअखेर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. परिणामी, विभागीय वरिष्ठ अधिकारी आरोपी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत का, असा संशय उपस्थित होत आहे.

समितीने केलेल्या गंभीर आरोपांमध्ये —

तब्बल 1000 बनावट भोगवटा पत्र दस्त तयार करणे,

बनावट मोजणी पत्रक तयार करणे,

रेरा कायद्याचे उल्लंघन करून दस्त नोंदणी करणे,

तुकडे जोड कायद्याविरुद्ध दस्त नोंदणी,

तसेच याआधीच्या विभागीय तपासणीत दोषी आढळूनही कोणतीही कारवाई न होणे,
यांचा विशेष समावेश आहे.

याप्रकरणी समितीने ठामपणे मागणी केली आहे की, सहाय्यक दुय्यम निबंधक हनुमंत चव्हाण यांना तात्काळ निलंबित करून त्यांची पेन्शन बंद करावी, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्या सर्व मालमत्तेची जप्ती करून ती सरकारी तिजोरीत जमा करावी. तसेच महाराष्ट्र सरकारचे बुडालेले पाच कोटी रुपये परत मिळेपर्यंत समितीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरू राहील.

या आंदोलनावेळी समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्रे पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश शिंदे पाटील, माहिती अधिकार प्रदेशाध्यक्ष गणेश घाडगे, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष सचिन खंडागळे, शिरूर तालुका माहिती अधिकार अध्यक्ष निलेश लोंढे, पुणे जिल्हा संघटक सागर हंगे तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, आंदोलनामुळे विभागीय कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:16 am, June 9, 2026
33°C
साफ आकाश
45 %
24 Km/h
Wind Gust: 26 Km/h
Clouds: 5%
Visibility: 10 km
Sunrise: 5:49 am
Sunset: 7:11 pm
Translate »
error: Content is protected !!