नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मेहकर-लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ७.८० कोटींची नुकसानभरपाई मंजूर

DPT NEWS✍️🗞️📰🗞️✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – हितेश शेठाने

मेहकर : दिनांक २५ जून रोजी मेहकर तालुक्यातील सर्व ११ मंडळे व लोणार तालुक्यातील ५ मंडळात झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे सुमारे ६० हजार हेक्टरवरील शेतीचे मोठे नुकसान झाले होते. या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांची पेरणी वाया गेली होती. शासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करून ७१.५० कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला होता. मात्र खरडून गेलेल्या व गाळ साचलेल्या जमिनींसाठीची नुकसानभरपाई अद्याप प्रलंबित होती.
या प्रलंबित प्रश्नावर आमदार सिद्धार्थ खरात यांनी सातत्याने पाठपुरावा करत मुख्यमंत्री व मदत व पुनर्वसन मंत्री मा. मकरंद आबा पाटील यांना भेटून मदत त्वरीत मिळावी यासाठी मागणी केली होती. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी शासनाने ७.८० कोटी इतका निधी मंजूर केला आहे.
शासन निर्णय दिनांक २७ मार्च २०२३ नुसार –
खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टर ₹४७,०००
गाळ वाहून आलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टर ₹१८,००० नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे.
याअन्वये ३६७१ हेक्टरवरील ८३९७ शेतकऱ्यांना या नुकसानभरपाईचा लाभ होणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या निर्णयानंतर आमदार सिद्धार्थ खरात यांनी समाधान व्यक्त करत मा. मंत्री मकरंद आबा पाटील यांचे विशेष आभार मानले.
👉 शेतकऱ्यांना अपेक्षित दिलासा मिळाल्यामुळे या भागात समाधानाचे वातावरण आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:57 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
18 %
5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!