DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – प्रतिक पांडे
नागपूर :- जन ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शैलेंद्र साळे, प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे, राज्य कार्याध्यक्ष युवराज देवरे, राज्य उपाध्यक्ष धर्मेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जन ग्रामीण पत्रकार संघ, नागपूर यांच्या वतीने दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी संविधान चौक, नागपूर येथे भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात संघाचे पदाधिकारी, सदस्य तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चाचे नेतृत्व विदर्भ समन्वयक सुरजितसिंग बाठ, विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रतीक पांडे, विदर्भ विभागीय सचिव सचिन बैस, नागपूर जिल्हाध्यक्ष संजय तिवारी, नागपूर महिला अध्यक्ष शितल नंदनवार, तसेच उपाध्यक्ष अजहर पटेल, महिला सचिव प्राजक्ता चक्रवर्ती, महिला उपाध्यक्ष सीमा ठाकूर, नागपूर शहर कार्याध्यक्ष राजेश शुक्ला यांनी केले. यावेळी संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांबाबत शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी संविधान चौकात एकत्र येऊन ठाम भूमिका मांडली.
मोर्चात बोलताना संघाचे विदर्भ समन्वयक सुरजितसिंग बाठ यांनी सांगितले की, “पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आणि हक्कांसाठी शासनाने ठोस कायदे करणे अत्यावश्यक आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आमचा संघर्ष सुरू राहील.”
अध्यक्ष प्रतीक पांडे यांनी स्पष्ट केले की, “पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मात्र ग्रामीण भागातील पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या गंभीर असून शासनाने त्वरित त्या सोडवाव्यात.”
विदर्भ विभागीय सचिव सचिन बैस यांनी मोर्चादरम्यान व्यक्त केले की, “पत्रकारांवर होणारे हल्ले थांबले पाहिजेत. शासनाने पत्रकार संरक्षण कायद्यात थोडे बदल करून पत्रकारांवर हल्ले करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोरात कठोर कशी कारवाई करता येईल यासंदर्भात त्याच्यात बदल करावे.”
तसेच नागपूर जिल्हाध्यक्ष संजय तिवारी यांनी सांगितले की, “ग्रामीण पत्रकार हे खऱ्या अर्थाने समाजाचे आरसे आहेत. त्यांची उपेक्षा होऊ नये म्हणून आमचा हा मोर्चा आहे.”
महिला पत्रकारांच्या प्रश्नांवर भाष्य करताना शितल नंदनवार यांनी सांगितले की, “ग्रामीण महिला पत्रकारांना काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघ कटिबद्ध आहे.”
मोर्चात उपस्थित सर्व पदाधिकारी व सदस्यांनी शासनाकडे त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारावर झालेल्या हल्ल्याच्या हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी या मागण्यांचे निवेदन सादर केले. उपस्थितीमुळे संविधान चौक परिसर घोषणाबाजीने दुमदुमून गेला होता.
👉 हा निषेध मोर्चा शांततेत संपन्न झाला असून, संघाने पुढील काळात आपली लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामीण पत्रकार संघाचा नागपूर येथे त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे पत्रकारावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा
नागपूर :- जन ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शैलेंद्र साळे प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे राज्य कार्याध्यक्ष युवराज देवरे राज्य उपाध्यक्ष धर्मेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जन ग्रामीण पत्रकार संघ, नागपूर यांच्या वतीने दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी संविधान चौक, नागपूर येथे भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात संघाचे पदाधिकारी, सदस्य तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चाचे नेतृत्व विदर्भ समन्वयक सुरजितसिंग बाठ, विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रतीक पांडे, विदर्भ विभागीय सचिव सचिन बैस, नागपूर जिल्हाध्यक्ष संजय तिवारी, नागपूर महिला अध्यक्ष शितल नंदनवार, तसेच उपाध्यक्ष अजहर पटेल, महिला सचिव प्राजक्ता चक्रवर्ती, महिला उपाध्यक्ष सीमा ठाकूर, नागपूर शहर सचिव राजेश शुक्ला यांनी केले. यावेळी संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांबाबत शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी संविधान चौकात एकत्र येऊन ठाम भूमिका मांडली.
मोर्चात बोलताना संघाचे विदर्भ समन्वयक सुरजितसिंग बाठ यांनी सांगितले की, “पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आणि हक्कांसाठी शासनाने ठोस कायदे करणे अत्यावश्यक आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आमचा संघर्ष सुरू राहील.”
अध्यक्ष प्रतीक पांडे यांनी स्पष्ट केले की, “पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मात्र ग्रामीण भागातील पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या गंभीर असून शासनाने त्वरित त्या सोडवाव्यात.”
विदर्भ विभागीय सचिव सचिन बैस यांनी मोर्चादरम्यान व्यक्त केले की, “पत्रकारांवर होणारे हल्ले थांबले पाहिजेत. शासनाने पत्रकार संरक्षण कायद्यात थोडे बदल करून पत्रकारांवर हल्ले करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोरात कठोर कशी कारवाई करता येईल यासंदर्भात त्याच्यात बदल करावे.”
तसेच नागपूर जिल्हाध्यक्ष संजय तिवारी यांनी सांगितले की, “ग्रामीण पत्रकार हे खऱ्या अर्थाने समाजाचे आरसे आहेत. त्यांची उपेक्षा होऊ नये म्हणून आमचा हा मोर्चा आहे.”
महिला पत्रकारांच्या प्रश्नांवर भाष्य करताना शितल नंदनवार यांनी सांगितले की, “ग्रामीण महिला पत्रकारांना काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघ कटिबद्ध आहे.”
मोर्चात उपस्थित सर्व पदाधिकारी व सदस्यांनी शासनाकडे त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारावर झालेल्या हल्ल्याच्या हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी या मागण्यांचे निवेदन सादर केले. उपस्थितीमुळे संविधान चौक परिसर घोषणाबाजीने दुमदुमून गेला होता.
👉 हा निषेध मोर्चा शांततेत संपन्न झाला असून, संघाने पुढील काळात आपली लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.