DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी योगेश गवळे
सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत शासनाने बंदी घातलेल्या मांगुर जातीच्या माशांची बेकायदेशीर वाहतूक करणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे. या कारवाईत एक आयशर ट्रक आणि सुमारे ४.६ टन मांगुर मासे असा एकूण २५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, पुणे येथून परराज्यात मांगुर जातीच्या माशांची अवैधरित्या वाहतूक केली जात आहे. या माहितीवरून त्यांनी स.पो.नि. रुपाली चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार समाधान बोराडे, नितीन डावखर, अमोल शिंदे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड व प्रशांत सहाणे यांचे पथक तयार करून संगमनेर नाका येथे नाकाबंदीचे आदेश दिले.
नाकाबंदी दरम्यान, संशयास्पद आयशर ट्रक (क्र. एम.पी. ०९ ए.एफ. १७१९) थांबवून तपासणी केली असता, वाहनात काळ्या ताडपत्रीखाली पाणी भरून त्यात मासे आढळले. चौकशीत चालकाकडे कोणतेही वाहतूक परवाने किंवा कागदपत्रे न आढळल्याने ट्रक पोलिस ठाण्यात आणण्यात आला. तपासादरम्यान जिल्हा मत्स्य विकास कार्यालयातील प्रभारी सहाय्यक आयुक्त श्री. किशन वाघमारे यांनी तपासणी करून हे मासे शासनाने प्रतिबंधित केलेल्या मांगुर प्रजातीचे असल्याचे निश्चित केले.
त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६३७/२०२५ दाखल करण्यात आला असून आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३, २७५, अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ कलम ५८, ५९, तसेच पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम ३, ५, १५ नुसार कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत अटक करण्यात आलेले आरोपी —
१️⃣ लुनाजी रतन ताड (वय ५५, रा. दलपुरा, जि. धार, म.प्र.)
२️⃣ लोकेश बागुलाल गतैया (वय ४०, रा. बगडी, ता. लालचा, जि. धार, म.प्र.)
३️⃣ करण हरीरामलाल चौहाण (वय २१, रा. रामपुरा, मांडव, ता. लालचा, जि. धार, म.प्र.)
ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक अदित्य मिरखेलकर, व उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील (निफाड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
पुढील तपास स.पो.नि. रुपाली चव्हाण या करत आहेत.
👉 सिन्नर पोलिसांच्या या कारवाईमुळे मत्स्यव्यवसायातील बेकायदेशीर हालचालींवर मोठा आळा बसला आहे.



