नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नांदेड पोलीस दलाकडून पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीदांना अभिवादन..

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – साईनाथ खंडेराय

नांदेड :- दिनांक 21 ऑक्टोबर 1959 रोजी हिमालयातील लडाख जवळ असणाऱ्या “हॉट स्प्रिंग” या सोळा हजार फुट उंचावर असणाऱ्या ठिकाणी केंद्रीय राखीव दलाचे जवान गस्त घालत असतांना अचानक चीनी सैन्याकडुन गोळीबार सुरू होवुन त्यांनी केलेल्या अनपेक्षित हल्ल्याला तोंड देतांना दहा जवान धरातीर्थी पडले. तेव्हा पासुन 21 ऑक्टोंबर हा दिन “हुतात्मा दिन” म्हणुन पाळला जातो.
कायदा व सुव्यवस्था राखने, नागरीकांचे जिवीताचे व मालमत्तेचे संरक्षण करणे ही कर्तव्य बजावत असतांना पोलीस दलातील अनेक अधिकारी व अंमलदार यांना प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती दयावी लागते. अशा प्रकारे विरगती प्राप्त झालेल्या अधिकारी/अंमलदारांना श्रध्दांजली वाहण्यासाठी त्यांचे स्मरणार्थ दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी पोलीस स्मृतीदिन पाळत आहोत.
आजचा दिवस पोलीस प्रशासनासाठी अत्याधिक महत्वाचा आहे. यावर्षी देखील संपुर्ण भारतातुन 191 पोलीस अधिकारी/अंमलदारांनी आपले कर्तव्य बजावत असतांना आपल्या मातृभुमीच्या संरक्षणार्थ प्राणाची आहुती दिलेली आहे. आपले कर्तव्य बजावताना आजपर्यंत ज्यांना विरगती प्राप्त झाली त्या सर्व हुतात्म्यांना श्री गुरुगोविंदसिंग कवायत मैदान पोलीस मुख्यालय नांदेड येथील स्मृती स्मारकास श्रध्दांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास मा. शहाजी उमाप पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र नांदेड मा. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक भोकर, मा. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड शहर, मा. रामेश्वर वेंजने, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर, मा. श्रीमती डॉ. अश्विनी जगताप, उपविभागीय पोलीस अधीकारी कंधार चार्ज गृह पोलीस उप-अधीक्षक नांदेड, मा. उदय खंडेराय, पोनि स्थागुशा मा. विजय धोंडगे, रापोनि पो.मु. नांदेड, तसेच नांदेड शहरातील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन पोलीस अधिकारी व अंमलदारांनी शहीदांना अभिवादन करून पुष्पचक्र अर्पण करून, शहीदांना मानवंदना देवुन पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन मा. श्रीमती डॉ. अश्विनी जगताप, उपविभागीय पोलीस अधीकारी कंधार गृह पोलीस उप-अधीक्षक नांदेड, यांनी केले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:56 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
18 %
5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!