नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सोयाबीनला भाव द्या अन्यथा आंदोलन करू शेतकऱ्यांचा इशारा

DPT NEWS ✍️🗞️📰✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी मिलिंद इंगळे

अकोला – यावर्षी वृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अमाप नुकसान झाले आहे, नाफेडच्या भाव खरेदीची हालचाल कमी झाली असून शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाली आहे .
सोयाबीनला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात पडून ठेवले आहे.
नाफेडने ग्रेड नुसार खरेदी करावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.
कापूस खरेदी योजनेमध्ये सुध्दा सुपर एफ क्यू फेअरचे धोरण बंद करावे, शेतकऱ्यांनाच्या हिताच्या योजना आखून पिकाला भाव द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे .
विविध क्षेत्रात खाजगीकरण झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
वाढती महागाई व पिकाला हमी भाव नाही. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. विविध मागण्या करून ही त्याची पुर्तता करण्यास सरकार असमर्थ आहे.
त्या बरोबरच सोलर विजेची भानगड, पाण्याची समस्या अशा विविध प्रश्नांवर शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.
१ जानेवारी पासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रगती शेतकरी मंडळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना,राष्ट्रीय किसान मोर्चा इत्यादी संघटनेने दिला आहे.
या वेळी पत्रकार परिषदेत शेतकरी राजू वानखडे,अरूण बोंडे, कैलास साबळे, सिध्दार्थ भगत ,नाजुकराव अघमे,मनोहर भगत,सुधाकर गौरखेडे,प्रमोद राजंदेकर इत्यादी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:50 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
31 %
13 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!