नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

लखन बेनाडे खून प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद; राजारामपुरी पोलिसांची कारवाई

DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – संजय दिंडे

कोल्हापूर: राजारामपुरी पोलिसांनी लखन अण्णाप्पा बेनाडे खून प्रकरणातील एका पाहिजे असलेल्या फरार आरोपीला शिताफीने अटक केली आहे. महंमद दस्तगीर कच्ची (वय २२, रा. सुभाषनगर, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
१० जुलै २०२५ रोजी सायबर चौक ते शाहू टोल नाका आणि पेद्रेवाडी (ता. आजरा) परिसरात लखन बेनाडे यांचा खून झाला होता. या प्रकरणी नीता उमाजी तडाखे यांनी फिर्याद दिली होती. या गुन्ह्यात यापूर्वीच ११ आरोपींना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासादरम्यान महंमद कच्ची याचे नाव निष्पन्न झाले होते, मात्र तो तेव्हापासून फरार होता.
अशी झाली अटक
आरोपी महंमद कच्ची हा कोल्हापूरमधील सुभाषनगर भागात येणार असल्याची गोपनीय माहिती राजारामपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत यांना त्यांच्या बातमीदाराकडून मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सुभाषनगर परिसरात सापळा रचला. आरोपी त्या ठिकाणी येताच पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले आणि अटक केली.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी
ही कारवाई कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धिरजकुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत खालील पथकाचा सहभाग होता:
सतीश होडगर (पोलीस निरीक्षक, राजारामपुरी पो. ठाणे)
सचिन चंदन (पोलीस उपनिरीक्षक)
कर्मचारी: तानाजी चौगुले, कृष्णांत पाटील, संदीप सावंत, सत्यजित सावंत, सुशांत तळप, अमोल पाटील, नितीश बागडी, विशाल शिरगावकर आणि सचिन पाटील.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!