नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

रोड रोमिओंविरोधात कारवाईची मागणी; मुस्लिम युवा मंचचे पिंपळनेर पोलिसांना निवेदन

DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी : साकिब सैय्यद

पिंपळनेर:- पिंपळनेर शहरातील इंदिरानगर परिसरात असलेल्या अँग्लो उर्दू हायस्कूलच्या आजूबाजूला विद्यार्थिनींना छेडछाड करणाऱ्या रोड रोमिओंचा उपद्रव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम युवा मंच पिंपळनेरच्या वतीने पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) किरण बर्गे यांना निवेदन देण्यात आले.
शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत काही समाजकंटकांकडून विद्यार्थिनींना त्रास दिला जात असल्याने शाळेत जाणाऱ्या मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण असून संबंधित रोड रोमिओंवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, तसेच शाळा परिसरात पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी मुस्लिम युवा मंच पिंपळनेरच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी एपीआय किरण बर्गे यांनी प्रकरणाची दखल घेत शाळा परिसरात योग्य ती कारवाई व सुरक्षा व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!