नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बिलोली नगराध्यक्षांचा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मौन, सरपंच-ग्रामसेवकांच्या स्वागताला मात्र उत्साह?

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मौन आणि पदाधिकाऱ्यांच्या स्वागताला मात्र पुळका कसा…..?

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी:साईनाथ खंडेराय

बिलोली:- बिलोली नगरपरिषदेमध्ये अध्यक्षपद भूषविणारे संतोष कुलकर्णी यांच्या भूमिकेबाबत तालुक्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या अन्यायाविरोधात सुरू असलेल्या उपोषणस्थळी उपस्थित राहूनही “मला या विषयाची माहिती नाही” असे वक्तव्य करून हात झिडकारून उपोषण स्थळापासून निघून गेले याबद्दल शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात आले होते.
शेतकऱ्यांचा आरोप असा की, सोयाबीनच्या 50 किलोच्या मालाऐवजी जवळपास 54 किलो वजन घेण्यात आले. तसेच हमालीही जादा आकारण्यात आली. हा प्रकार प्रत्यक्ष पाहिल्यानंतर गजानन शिंदे (तहसीलदार) आणि कौरवार (सहाय्यक उपनिबंधक, बिलोली) यांनी अन्याय झाल्याचे मान्य करत कार्यवाहीचे आश्वासन दिले होते.
मात्र, ज्या वेळी शेतकरी न्यायासाठी उपोषण करत होते, त्या वेळी ठाम भूमिका न घेणारे नगराध्यक्ष आता तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवकांना आपल्या फार्म हाऊसवर स्वागतासाठी बोलवत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मौन आणि पदाधिकाऱ्यांच्या स्वागताला मात्र पुळका कसा?” असा सवाल नागरिक विचारत आहेत.
गावपातळीवरील निर्णय आणि व्यवहार थेट शेतकऱ्यांशी संबंधित असताना त्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून स्वागत समारंभ घेणे म्हणजे अन्नदात्यांचा अपमान नाही काय? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.
जनतेचे कैवारी म्हणून ओळख निर्माण केलेल्या अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहण्याची नेतृत्वाकडून अपेक्षा असते परंतु आता नगराध्यक्ष या प्रकरणात स्पष्ट भूमिका घेणार का, की मौनच राखणार? याकडे बिलोली शहरातील आणि तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
माजी जि.प. सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, माजी सरपंच गणेश पाटील शिंपाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनिल यंबडवार, माजी सरपंच प्रभाकर पेंटे, माजी तालुकाध्यक्ष गिरीधर डाकोरे, हाजप्पा पा. सुंकलोड, श्रीनिवास पा. शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हे सर्व नेते एकेकाळी शेतकऱ्यांसाठी लढा दिलेले असताना सुद्धा इतक्या दिवसापासून चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या अन्यायाबद्दल वाचा फोडत असताना सुद्धा एवढे मौन का? शेतकऱ्यांबद्दलची सहानुभूती आज कुठे गेली? निवडणुकीपुरत्याच शेतकऱ्यांचा वापर केला जातो का? आज त्यांना शेतकऱ्यांची हाक आणि त्यांच्यावर होणारा अन्याय दिसून येत नाही का ? असे अनेक यक्ष प्रश्न शहरातील शेतकरी वर्गात दिसून येत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:28 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
19 %
2 Km/h
Wind Gust: 3 Km/h
Clouds: 4%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!