नंदुरबार – रविंद्र गवळे
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 जयंती निमित्त सुरत महानगर जयंती महोत्सव समितीद्वारे विश्वशांती संदेश यात्रा काढण्यात आली.या संदेश यात्रेचे रूपांतर सुरत रेल्वे स्टेशन मान दरवाजा रिंगरोड जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याजवळ सभेत झाले.यावेळी मोठा जनसागर लोटला होता.या सभेस गुजरात राज्य लोकजनशक्ती पार्टीचे उपाध्यक्ष प्रभाकर नागमल यांनी संबोधित केले. सुरत शहराचे उपनगर उत्राण येथील त्रिरत्नदीप महाबुद्ध विहार येथून निघालेली विश्वशांती संदेश यात्रा अमरोली, कोसाड, ईएसडब्लू आवास करत सरदार वल्लभभाई पटेल प्रतिमा,रिंगरोड सुरत रेल्वे स्टेशन मानदरवाजा जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याजवळ आली.यासोबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावलेली सुमारे 200 वाहने व मोठ्या संख्येने भीमसैनिक, महिला व आबालवृद्धांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता.यावेळी मिरवणुकीत यूपीचे इन्कम टॅक्स कमिशनर सुबद्दनराम साहेब, गुजरात अल्पसंख्यांक बोर्डाचे सदस्य काशिनाथ शिरसाठ, गुजरात राज्य लोकजनशक्ती पार्टीचे उपाध्यक्ष प्रभाकर नागमल, समाज विकास परिषदेचे दिलीप शिरसाठ, माजी नगरसेवक सुरेश सोनवणे,आसाराम शिंदे,गोविंद पिंपळीस्कर, वरिष्ठ कार्यकर्ते नामदेवराव झाल्टे, एल.जी.पीचे सुरेश झाल्टे, दिलीप सुखदेव अहीरे गुरुजी,जेष्ठ कार्यकर्ते भास्कर हरी वानखेडे व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थेचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.



