नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यातील जखमी अनुदानापासून वंचित तळोदा तालुका ; वनविभाग उदासीन

प्रतिनिधी
प्रविण चव्हाण

नंदुरबार -: तळोदा तालुक्यातील झिरी पाठाडी येथे हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकासह खुर्चीमाळ येथील दोन वर्षीय बालिका अद्यापही सानुग्रह अनुदानापासून वंचित आहेत . वनविभागाकडून हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने मदत करण्याची तरतूद आहे . परंतु तळोदा वनविभाग मात्र अद्यापही पशुसंवर्धन विभागाच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहे . २४ एप्रिल रोजी खुर्चीमाळ येथे दोन वर्षीय बालिका आराध्या तर ४ मे रोजी झिरी येथील हेमंत पाडवी याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती दिली गेली होती . या दोघांना तातडीची मदत म्हणून सानुग्रह अनुदान देणे अपेक्षित होते . परंतु वनविभागाला दोघांवर उपचार पूर्ण होऊनही पशुसंवर्धन विभागाचा अहवाल मिळालेला नाही , वैद्यकीय उपचार करणाऱ्यांनी हिंस्त्र प्राण्याने हल्ला केल्याचा अभिप्राय दिल्या नंतर वनविभाग पशुसंवर्धन विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा करत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे . दरम्यान , पशुवैद्यकीय विभागाचा अहवाल आला नसून जखमी झाल्याचे | स्वरूप स्पष्ट झाल्या शिवाय त्याला मदत करता येत नाही . खासगी दवाखान्यात उपचार घेतले असते तर तत्काळ कुठल्या तरी तरतूद आर्थिक मदत त्याला केली गेली असती , अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश रोडे यांनी दिली आहे .
‘ वाघा’चीच चर्चा एकीकडे दोघांना मदत मिळत नसल्याचे समोर आले असतानाच , झिरी येथे युवकावर हल्ला करणारा प्राणी हा बिबट्या नसून पट्टेदार वाघ असल्याची माहिती दिली जात आहे . हेमंत वळवी याचा बचाव करणारे जोरमा नेथ्या पाडवी यांनी हातातील डेंगाऱ्याने त्या प्राण्याला हुसकावून लावल्याचा दावा केला होता , यात तो प्राणी पट्टेदार वाघ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:11 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!