DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – योगेश गवळी
नांदगांव : नांदगांव येथील महाजन वाडा येथील रहीवाशी गणेश वाल्मीक शर्मा यांच्या राहत्या बंद घराचे चोरांनी कुलुप तोडून आत प्रवेश करुन सुमारे ७ तोळे सोने (पाच लाखाचे) व १ लाख ४० हजार रु रोकड कॅश पळविली हि घटना शहरातील मध्यवर्ती वस्तीतील महाजन वाडा येथे घडली.
या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. घटनेचा पोलिसांनी पंचनामा करुन तपास सुरु केला आहे. डाॅग काॅड देखील तपासकामी वापरला गेला पण चोर वाहनानाने पसार झाले असावे. शर्मा कुटूबीय धार्मीक कार्याला नाशिक गेले असता तिसऱ्या दिवसी गावी आले आसता भामट्यांनी घरातील पाच कुलपे तोडून भिंतीला लावलेली फरशी तोडफोड करुन लोखंडी मागचा दरवाजा तोडून आत प्रवेश करुन शोकेश, कपाट, दिवान, पलंगाची उचकापाचक करुन भामट्यांनी राञीच्या वेळी चोरी करुन पसार झाले. भामट्यांच्या हाती सुमारे सात तोळे सोने व १ लाख ४० हजार रु. रोख कॅश देव्हाऱ्यातील चांदीचा देव, २०० ग्रॅम चांदी आदी मौल्यावान वस्तू पळविल्या.


दिं ५ रोजी शनिवारी दु २ वा शर्मा परीवार
नाशिक गेले व नंतर दि. ८ रोजी सोमवारी राञी ९ वा गावी घरी आले असता चोरानी घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश करुन चोरी केल्याचे समजले तेव्हा पोलिसांना पाचारण करण्यात आले .
चार दिवसापूर्वी देखील श्रीराम नगर मध्ये एका घरातुन रोकड कॅश चोरीला गेल्याची घटना घडली आहे. पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजू मोरे तपास करीत आहे.



