DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️. धुळे : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तहसील कार्यालयातील लिपिक दिपक बाबुराव जोंधळे यास २५०० रुपयांची लाच तक्रारदार यांच्याकडून मागणी करून स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल.
तक्रारदार हे वकीली व्यवसाय करीत असुन त्यांचे पक्षकार यांचे विरुध्द मेहुनबारे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असुन मेहुनबारे पोलीस स्टेशन कडुन सी. आर. पी.सी. कलम १०७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करणे करीता मा. तहसिलदार, चाळीसगाव यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
सदर प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये पुढील तारीख न देता जामिन मंजुर करण्यास मदत करण्यासाठी फौजदारी लिपीक दिपक जोंधळे यांनी तक्रारदार यांचे कडे दि.०९.०८.२०२३ रोजी लाचेची मागणी केल्याची दुरध्वनी व्दारे दि.१०.०८.२०२३ रोजी माहीती दिली होती. सदर माहीती वरुन धुळे ला. प्र. विभागाचे पथकाने चाळीसगाव येथे जावुन तकारदार यांना भेटुन त्यांची तक्रार लिहून घेतली होती.
सदर तक्रारीची दि.१० ऑगस्ट रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान फौजदारी लिपीक दिपक जोंधळे यांनी पंचांसमक्ष २,५००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम तक्रारदार यांच्या कडुन स्वतः स्विकारतांना त्यांना तहसिल कार्यालय, चाळीसगाव येथे रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचे विरुध्द चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन जिल्हा जळगाव येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, गायत्री पाटील, मकरंद पाटील, रामदास बारेला, भुषण खलाणेकर, सुधीर मोरे या पथकाने केली आहे.
सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. माघव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक मा. श्री.नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.