DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- गोकुळ नगराळे, अकिल शहा
साक्री: साक्री तालुक्यातील दिघावे येथे अनधिकृत विना परवाना, विना पावती/ बिल वाल पापडी बियाणे विक्री करण्याच्या उद्देशाने साठविनाऱ्या एका इसमा विरोधात कृषी विभागाने कारवाई केली असुन त्याच्या विरोधात साक्री पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश महादेव नेतनराव (वय ५२) बियाणे निरिक्षक तथा कृषी अधिकारी पंचायत समिती साक्री यांनी साक्री पोलीस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.११ जून २०२४ मंगळवारी रोजी दुपारी १२:०० वाजेच्या सुमारास ते त्यांच्या कार्यक्षेत्र दोऱ्यावर असतांना त्यांना त्यांच्या दुरध्वनीव्दारे गोपनीय माहिती मिळाली होती की, दिघावे ता. साक्री जि. धुळे येथे अजय शांताराम दशपुते हा विना परवाना वाल पापडी या बियाण्याची शेतकऱ्यांना विक्री करत असून तसेच शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या बियाण्याचे कोणतेही बिल देत नाही त्या अनुषंगाने गोपनीय माहिती वरिष्ठ अधिकारी प्रदीप कुमार निकम यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविली त्यानुसार प्रदीप कुमार निकम(मोहीम अधिकारी जिल्हा परिषद, धुळे) शासकीय पंच म्हणून राजेश कुमार चौधरी, शिरीष कुमार कोकणी यांच्या समवेत स्वतः साक्री पोलीस स्टेशनला हजर राहून गोपनीय माहितीची खात्री करण्याच्या दृष्टीने तसेच छापा टाकण्याच्या उद्देशाने पत्र देऊन मदत मागितली त्यानुसार साक्री पोलीस स्टेशनचे पोकॉ चेतन आढारे यांना पथकात सोबत घेऊन खाजगी वाहनाने दिघावे या गावी संध्याकाळी ०५:४० वाजता पोहचून स्थानिक चौकशी केली असता श्री अजय शांताराम दसपुते (वय ३०) रा. दिघावे हा इसम दिघावे पिंपळनेर रोड वरील बस स्टँड वरील डीपी जवळसाक्री तालुक्यातील दिघावे येथे अनधिकृत विना परवाना, विना पावती/ बिल वाल पापडी बियाणे विक्री करण्याच्या उद्देशाने साठविनाऱ्या एका इसमा विरोधात कृषी विभागाने कारवाई केली असुन त्याच्या विरोधात साक्री पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश महादेव नेतनराव (वय ५२) बियाणे निरिक्षक तथा कृषी अधिकारी पंचायत समिती साक्री यांनी साक्री पोलीस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.११ जून २०२४ मंगळवारी रोजी दुपारी १२:०० वाजेच्या सुमारास ते त्यांच्या कार्यक्षेत्र दोऱ्यावर असतांना त्यांना त्यांच्या दुरध्वनीव्दारे गोपनीय माहिती मिळाली होती की, दिघावे ता. साक्री जि. धुळे येथे अजय शांताराम दशपुते हा विना परवाना वाल पापडी या बियाण्याची शेतकऱ्यांना विक्री करत असून तसेच शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या बियाण्याचे कोणतेही बिल देत नाही त्या अनुषंगाने गोपनीय माहिती वरिष्ठ अधिकारी प्रदीप कुमार निकम यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविली त्यानुसार प्रदीप कुमार निकम(मोहीम अधिकारी जिल्हा परिषद, धुळे) शासकीय पंच म्हणून राजेश कुमार चौधरी, शिरीष कुमार कोकणी यांच्या समवेत स्वतः साक्री पोलीस स्टेशनला हजर राहून गोपनीय माहितीची खात्री करण्याच्या दृष्टीने तसेच छापा टाकण्याच्या उद्देशाने पत्र देऊन मदत मागितली त्यानुसार साक्री पोलीस स्टेशनचे पोकॉ चेतन आढारे यांना पथकात सोबत घेऊन खाजगी वाहनाने दिघावे या गावी संध्याकाळी ०५:४० वाजता पोहचून स्थानिक चौकशी केली असता श्री. अजय शांताराम दशपुते (वय ३०) रा. दिघावे हा इसम दिघावे पिंपळनेर रोड वरील बस स्टँड वरील डीपी जवळ महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र यांच्या समोरील मोकळ्या जागेत शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करीत असताना व त्याच्या ताब्यात असलेले मे पालीवाल सोहम सीड्स कंपनी अहमदाबाद उत्पादित वाल पापडी या पिकाची लाॅंट नंबर PSAK 245T साठा 25 पाकिटे 1kg /pkt प्रती पाकीट किंमत 1050 रु. असे एकूण 26250 रूपये किमतीचा अधिकृत रित्या विनापरवाना साठा आढळून आला. पथकाने अजय दशपूते यांच्याशी या बाबत विचारणा केली असता त्याने कुठलीही माहिती पथकास दिली नाही त्यानूसार श्री. अजय शांताराम दशपुते रा.दिघावे या इसमा विरोधात साक्री पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास साक्री पोलीस चे प्रभारी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी करीत आहेत.