अंतविधीसाठी उजेड पाडवा म्हणून घेऊन जावे लागत आहे चार चाकी वाहने
DPT NEWS NETWORK✍️🗞️🗞️
प्रतिनिधी:- साईनाथ खंडेराय
नांदेड :- बिलोली शहरातील सार्वजनिक स्मशानभूमी हे शहरातील मोठी स्मशानभूमी असून या ठिकाणी संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून अंधारामध्ये अंत्यविधी होत आहे ज्या घरच्या माणसाचे निधन झालेले असते त्या घरच्या लोकांना त्या ठिकाणी जाण्यासाठी तिथे गेल्यानंतर कंदील मोबाइल टॉर्च किंवा चार चाकी वाहनाच्या लाईटचे उपयोग करून रात्रीच्या वेळेस अंधारामध्ये अंतविधी करण्यात येत आहे या स्मशानभूमीची बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार प्रसारित झाल्या असून सुद्धा याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे तरी येणाऱ्या 26 जानेवारी पर्यंत जर संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन जर लाईटची सोय तिथे करीत नसेल तर येणाऱ्या 26 जानेवारी रोजी महात्मा गांधीजींचा आदर्श घेऊन मुख्य चौरसत्यावर चंदा करून लाईटची सोय करणार आहेत अशी चर्चा गावातील नव तरुणांकडून होत आहे.