नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बनावट दारू विना परवाना विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवणाऱ्या विरोधात साक्री पोलिसांची धडक कारवाई

३९,२७,००० रू. किमतीचा मुद्देमाल हस्तगत.

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा / गोकुळ नगराळे

साक्री :- साक्री पोलीस स्टेशन च्या हद्दीत असलेल्या म्हसदी या गाव शिवारातील शेवग्याच्या शेतात छापा टाकून बनावट दारू विना परवाना विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात आली त्याच्याकडून एकुण 39,27,000 रू. किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.


याबाबत फिर्यादी पोहेको/शांतीलाल पाटील (४०) यांनी साक्री पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.१०/०१/२०२५ शुक्रवारी रोजी ०३:३० वाजेच्या सुमारास म्हसदी गाव शिवारातील वसंत शामराव गुंजाळ रा. म्हसदी ता.साक्री यांच्या मालकीच्या शेवगा पिकाच्या शेतामध्ये मुलगा जयेश गुंजाळ याने अवैध दारुसाठा लपविल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी प्रभारी अधिकारी सपोनि जयेश खलाणे यांनी साक्री पोलीस स्टेशनचे सपोनि अनिल बागुल, पोसई प्रसाद रौंदळ, पोसई साळुंखे व पोलीस स्टाफसह आदेशित केल्याने सदर टिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी खालील वर्णनाचा मुद्येमाल मिळुन आला आहे.

१) ३४,५६,०००/- रु. किं.ची ROYAL BLUEखालील वर्णनाची व किंमतीची मानवी जिवितास हानीकारक व विना बेंच आणि मॅन्युफॅक्चर नंबर आणि विक्री किंमत नसलेली बनावट दारु विनापरवाना बेकायदेशिर विक्री करण्याच्या उद्देशाने पिवळया ताडपत्री खाली लपवून ठेवल्याची माहिती साक्री पोलीसांना मिळाली होती,त्यानुसार छापा टाकला असता  1)34,56,000/- रु. कि. थी ROYAL BLUE malt WHISKY DISTILLED BLENDED & BOOTTLED BY PIGGOT CHAPMAN & CO COLVALE INDUSTRIAL ESTATE BARDEZ, GOA PRODUCE OF INDIA 180 ml असे लेबल असलेली Mfg. Dt. B.No- आणि विक्री किंमत नसलेली 180 एमएल व्हीस्कीचे एकुण 360 खोके प्रत्येक खोक्यात 48 सिलबंद बाटल्या प्रत्येकी किंमत 200/- रु. कि अंदाजे जु था 2) 04,70,400/- रुपये किंमतीची देशी दारु सुगंधी संत्रा 180 मिली असे लेबल असलेली एकुण 140 खोके प्रत्येक खोक्यात 48 सिलबंद बाटल्या प्रत्येकी किंमत 70/-रु कि अंदाजे जु या 3) 600/- रु कि ची पिवळ्या रंगाची ताडपत्री असा एकुण 39,27,000/- रुपये कि. मुद्देमाल मिळून आला म्हणून साक्री पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक श्री जयेश खलाणे यांच्या आदेशान्वये आरोपी जयेश गुंजाळ विरुध्द सी.सी.टि.एन.एस.नं 0007/2025 भारतीय न्याय संहिता कलम-123,336 महा दारुबंदी अधि. कलम 65 (अ), 65 (इ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास साक्री पोलीस ठाण्याचे पोसई प्रसाद रौंदळ करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक  श्रीकांत धिवरे धुळे, मा.अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, धुळे मा. उप विभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे धुळे ग्रामीण विभाग साक्री, मा श्रीराम पवार स्थागुशा धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. जयेश खलाणे, सपोनि. अनिल बागुल, सपोनि विकास शेवाळे, पोसई. प्रसाद दिलीप रौंदळ, पोसई. राजेंद्र साळुंखे, असई राजु जाधव, पाहेकॉ. संजय गोकुळ शिरसाठ, पोहेकॉ. शांतीलाल पाटील, पोकॉ/तुषार जाधव, चापोना/आनंद चव्हाण, पोकॉ/ साईनाथ पवार, चापोकॉ. धंनजय चौधरी अशांनी केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:23 am, January 13, 2025
temperature icon 19°C
साफ आकाश
Humidity 58 %
Wind 9 Km/h
Wind Gust: 11 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!