नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मेहुनबारे पोलिसांनी अनोळखी आरोपीतानी केलेला खुनाच्या प्रयत्नाचा गंभीर गुन्हा आणला उघडकीस

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- अजगरभाई मुल्ला


जळगाव :- महाराष्ट्रात नेहमी कुठे ना कुठे गुन्हेगारी घटना घडत असतात काही गुन्ह्यांमध्ये पोलिसांना आरोपी शोधणे फार जिगरीचे ठरते असाच प्रकार जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मेहुनबारे पोलीस स्टेशन हद्दीतय घडला.

दि. 04/01/2025 रोजी रात्री 11/30 वाजताचे सुमारास इसम नामे अशोक रघुनाथ गायकवाड, वय 60 वर्षे, रा. देवळी, ता. चाळीसगाव हे त्यांचे राहते घरामध्ये झोपलेले असताना दोन अनोळखी इसमांनी तोंडाला रूमाल बांधून येवून घराच्या मागील दरवाजाने प्रवेश करून काही एक न बोलता त्यांच्याकडील धारदार तलवारीने व चाकूने अतिशय निर्दयपणे व क्रूरपणे वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, त्यांच्या डोक्यावर, दोन्ही गालांवर व दोन्ही हातांवर वार करण्यात आले होते. यामध्ये अशोक गायकवाड यांना त्यांचा डावा हात गमवावा लागला आहे. सदरबाबत जखमी अशोक गायकवाड यांची सुन बेबाबाई चंदर गायकवाड, रा. देवळी, ता. चाळसीगांव यांच्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं 03/2025 भा. न्या. सं. कलम 109, 332 (मी), 238, 3 (5). सह मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) 135 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. नमुद गुन्हयातील आरोपी हे अनोळखी असल्यामुळे तसेच सदरची घटना ही रात्रीच्या वेळी झालेली असल्याने आरोपींची ओळख पटवून अटक करणे एक आव्हान होते.

जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगांव श्रीमती कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगांव उपविभाग, राजेशसिंह चंदेल यांनी सदर गुन्हयातील दोन्ही अनोळखी आरोपीतांचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शनपर सुचना दिल्या होत्या.

वरिष्ठांच्या सुचनांप्रमाणे गुन्ह्याचा सखोल तपास करून गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणणेकामी प्रभारी अधिकारी प्रविण दातरे, सहायक पोलीस निरीक्षक यांनी पोलीस स्टेशन अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार केले होते. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपणीय माहीतीच्या आधारे कौशल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणून आरोपी नामे सागर राजू गायकवाड वय 24 वर्षे रा. देवळी ता. चाळीसगांव यास गुन्हयात अटक केली. नमुद आरोपीने गुन्हयाची कबुली देवून सदरचा गुन्हा हा त्याचा अल्पवयीन लहान भाऊ याचेसह केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे आरोपीचा लहान भाऊ यास ताब्यात घेवून तपास केला असता त्याचा गुन्हातील सहभाग निष्पन्न झाला असून तो अल्पवयीन असल्याने त्यास अभिरक्षा गृह, जळगांव येथे जमा करण्यात आले आहे. तसेच आरोपीतांनी जखमी इसमावर ज्या तलवारीने व चाकूने वार केले होते तो तलवार व चाकू गुन्हयाचे तपासात हस्तगत करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी प्रविण दातरे सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उप-निरीक्षक सुहास आव्हाड,  विकास शिरोळे तसेच पोहेको गोकूळ सोनवणे, दिनेश पाटील, किशोर पाटील, शांताराम पवार, पोना, प्रकाश कोळी, नंदकिशोर महराजन, अशोक राठोड, पोको विनोद बेलदार, संजय लाटे, निलेश लोहार, भुषन बावीस्कर यांनी केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:56 am, January 13, 2025
temperature icon 19°C
साफ आकाश
Humidity 58 %
Wind 9 Km/h
Wind Gust: 11 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!