स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळनेर पोलीस पथकाची संयुक्त कामगिरी
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री:- दि.28/12/2024 रोजी 06.30 वा. ते दि.29/12/2024 रोजी 09.00 वाजेचे दरम्यान सामोडे गावाचे शिवारातील फिर्यादी श्री. शाम शांताराम भदाणे रा. सामोडे ता.साक्री यांचे लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रिज नावाचे पत्रटी गोडावून फोडून एकूण 2,17,800/- रु. किं.चे वेल्डींग मशीन, रोटर, नांगर, कल्टीवेटर, हॅण्ड ग्राइंडर इ. अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने पिंपळनेर पोलीस ठाणे येथे गु.र.नं.323/2024 BNS क.334 (1) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना दि.06/01/2025 रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना प्राप्त गोपनिय माहितीचे आधारे पिंपळनेर पोलीस ठाणेचे पथकासह ओटा बारी (पिंपळनेर) येथुन रमेश शिवा वसावा, (वय 41) वर्ष, रा.गव्हाण ता.उच्छल जि.तापी (गुजरात राज्य) यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवून गुन्हयातील चोरी केलेला मुद्देमाल काढून दिला तसेच त्याचे अंगझडतीत एक गावठी कट्टा व एक जिवंत राऊंड मिळून आले आहेत.
तद्नंतर पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना गोपनिय माहिती प्राप्त झाली की, पिंपळनेर ते सामोडे रोडवरील भारत गैस गोडावुनजवळील शेतातील कांदयाचे चाळीत ठेवलेले सोयाबीन चोरी बाबत पिंपळनेर पोलीस ठाणे गु.र.नं. 04/2025 BNS क.331(3), 331(4), 305 दाखल असलेला गुन्हा देखील हयाच आरोपी रमेश शिवा वसावा याने केला आहे त्याअनुषंगाने त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवुन पांगरण ता. नवापूर जि. नंदुरबार येथे लपवून ठेवलेले 70 गोण्या सोयाबीन काढून दिले आहे.
त्याप्रमाणे त्यास पुन्हा विश्वासात घेवुन विचारपुस केली असता बोपखेल येथील प्रभात बिअर शॉपी मधुन इन्व्हेंटर व बॅटरी चोरी बाबत पिंपळनेर पोलीस ठाणे गु.र.नं. 190/2024 भादंवि क.380, 461 दाखल असलेला गुन्हा देखील हयाच आरोपी रमेश शिवा वसावा याने केला आहे. त्याअनुषंगाने त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवुन पांगरण ता. नवापूर जि. नंदुरबार येथे लपवुन ठेवलेले एक मायक्रोटेक्स कंपनीचे इन्व्हेंटर व मॅसिमो कंपनीची बॅटरी काढून दिली आहे.
आरोपीने गुन्हयात चोरी केलेला खालील मुद्देमाल काढुन दिल्याने हस्तगत करण्यात आला आहे. मुद्देमालाचे वर्णन खालील प्रमाणे.
मुद्येमालाचे वर्णन
1)3,000/-रु.कि.चे हॅण्ड ग्राइंडर
2)25,000/-रु.कि.चे लोखंडी टिलर
3)1,71,800/-रु.कि.चे एकुण 70 गोण्या सोयाबीन
4)25,000/-रु.कि.चा गावठी कट्टा
5)3,000/-रु.कि.चे 01 जिवंत काडतुस
6)15,000-रु.कि.चे एक मायक्रोटेक्स कंपनीचे इन्व्हेंटर व मॅसिमो कंपनीची बॅटरी
*असा एकुण 2,42,800 मुद्देमाल हस्तगत /-*
अशाप्रकारे स्थानिक गुन्हे शाखा, धुळे व पिंपळनेर पोलीस ठाणे यांचे संयुक्त पथकाने गावठी पिस्टलचा धाक दाखवुन घरफोड्या करणाऱ्या अट्टल घरफोड्यास मुद्देमालासह ओटाबारी (पिंपळनेर) येथुन रमेश शिवा वसावा, वय-41 वर्ष, रा.गव्हाण ता.उच्छल जि. तापी (गुजरात राज्य) यास ताब्यात घेवुन एकुण 2,42,800/- रु.किं.चा मुद्देमाल हस्तगत करुन खालील 3 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. सदर आरोपी घरफोडी करतांना गावठी कट्टा सोबत बाळगत असे. सदर आरोपीचे अंगझडतीत एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस मिळून आले आहे.
1)पिंपळनेर गु.र.नं323/2024 कलम BNS क.334(1)
2)पिंपळनेर गु.र.नं 04/2025 कलम BNS क.331(3), 331(4), 305
3) पिंपळनेर गु.र.नं 190/2024 भादंवि क.380, 461
*आरोपी रमेश शिवा वसावा, वय-41 वर्ष, रा.गव्हाण ता. उच्छल जि.तापी (गुजरात राज्य) याचेविरुध्द खालील प्रमाणे चोरी, घरफोडी व जबरीचोरीचे गुन्हे दाखल आहेत.*
क्र.पोलीस ठाणे
1) उच्छल पोलीस ठाणे (गुजरात)गु.र.नं.66/2015कलम भादवि क.380, 457
2) व्यारा पोलीस ठाणे (गुजरात)गु.र.नं.321/2016 भादवि क.380, 457
3) उच्छल पोलीस ठाणे (गुजरात)गु.र.नं.35/2019
भादंवि क.380, 457
4) नवापूर पोलीस ठाणे (नंदुरबार)गु.र.नं259/2018भादवि क.394, 341, 504, 427, 34
5) खापर पोलीस ठाणे (नंदुरबार)गु.र.नं55/1999भादंवि क.379
6) साक्री पोलीस ठाणे (धुळे)गु.र.नं266/2024 BNS क.331(4), 305(अ)
7) ताहराबाद पोलीस ठाणे (नाशिक ग्रामीण)गु.र.नं 169/2024भादवि क.380, 457
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पिंपळनेर पोलीस ठाणेचे सपोनि. किरण बर्गे, पोउनि. ईश्वर शिरसाठ, असई, संजय पाटील, पोहेकॉ. सदेसिंग चव्हाण, पोहेकॉ. तुषार सुर्यवंशी, पोहेकॉ. देवेंद्र ठाकुर, पोकॉ. निलेश पोतदार, पोकॉ. सुनिल पाटील, पोकॉ. अतुल निकम, पोकॉ. हर्षल चौधरी, चापोहेकॉ. कैलास महाजन तसेच पिंपळनेर पोलीस ठाणेचे पोकॉ. चेतन गोसावी, पोकॉ. रविंद्र सुर्यवंशी, पोकॉ. पंकज व पोकॉ. कैलास कोळी अशांनी केली आहे.