DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️✍️ प्रतिनिधी:- मनोहर गोरगल्ले
पुणे :- दिनांक 2/ 12 /2024 रोजी मौजे मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथे एस कॉर्नर येथील लक्ष्मीपूजन सोसायटी मध्ये अज्ञात चोरट्यांनी तीन बंद फ्लॅट फोडून 3 लाख 92 हजार 500 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व 3 लाख 80 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 7 लाख 72 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून नेला असल्याचे मंचर येथील लक्ष्मण अरुण दातखिळे वय 30 वर्ष राहणार एस कॉर्नर मंचर तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे यांनी मंचर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने गुन्हा रजिस्टरी दाखल केला होता.
उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे साहेब यांनी सदरच्या गुन्ह्या करिता तपास पथकांची नेमणूक केली असता पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर व त्यांचे सोबतचे पोलीस कर्मचारी गुन्ह्याच्या तपास करत असताना सदरचा गुन्हा मध्य प्रदेश येथील आरोपींनी केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. दिनांक 29 /12 /2024 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर व त्यांचे सोबतचे तपास पथकातील पोलीस कर्मचारी गुन्ह्याचा तपास करत असताना चोरी करणारे गुन्ह्यातील आरोपी हे त्यांचे कडे स्वीफ्ट कार एम. एच. 13 झेड. डी. 7856 मधून खेड मार्गे भीमाशंकर येथे जात असल्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक बडगुजर व त्यांचे टीमला माहिती मिळाल्याने सहा पोलीस निरीक्षक वडगुजर यांचे टीमने सीताफिने स्वीफ्ट कार नंबर एम. एच. 13 झेड. डी. 78 56 आरोपींना पकडून ताब्यात घेतले व आरोपीकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे १)अलमसिंह ईस्तो बामनिया वय 31 वर्ष राहणार करचट, तालुका कुक्षी, जिल्हा धार, मध्यप्रदेश २) अवलसिंग रामसिंग भुरिया वय 50 वर्षे राहणार देवधा तालुका कुक्षी, जिल्हा धार, मध्यप्रदेश ३) चमसिंग बदरु बामनिया वय 29 वर्ष राहणार ,तालुका कुक्षी,जिल्हा धार, मध्येप्रदेश ४) करणसिंग कालूसिंग भुरिया वय 38 वर्ष राहणार धोडदल्या, तालुका कुक्षी, जिल्हा धार, मध्यप्रदेश असे असल्याचे सांगितले व सदर घरफोडी चोरीचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. सदर आरोपींना अटक करून मा. न्यायालयात हजर करून १० दिवसांची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला आहे. पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान अटक आरोपींनी खालील गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. १) मंचर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण 176/2024 भारतीय दंड विधान कलम 457, 380. २) मंचर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण 182/ 2024 भा.द.वी कलम 457, 380, 511. ३) मंचर पोलीस स्टेशन 229/ 2024 भा. द.वि. कलम 554, 557, 380. ४) मंचर पोलीस स्टेशन 276/ 2024 भा.द.वी.कलम 454, 457, 380. ५) मंचर पोलीस स्टेशन 331/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(3) (4) ,305 (अ) ६) मंचर पोलीस स्टेशन 477 / 2024.भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331 (3),331(4),305 ७) वडगाव मावळ पोलीस स्टेशन 283/ 2024 भा.द.वी.कलम 454,457,380. ८) भोर पोलीस स्टेशन 195/2024 भारतीय न्याय संहिता (बी एन एस 2024 चे कलम 331(3), 331 (4),305 (अ ) ९) सासवड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर 09/2024 भा.द.वी. कलम 457,380. १०) पौंड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण 556 / 2024 भारतीय न्याय संहिता (बी एन एस ) 20123 चे कलम 331 (3),331 (4),305 (अ) सदर गुन्ह्यातील चोरी केलेले सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम मध्य प्रदेश येथे ठेवली असल्याचे अटक आरोपींनी सांगितल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर व त्यांचे सोबतचे तपास पथकातील पोलीस हवालदार संजय नाडेकर, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे, पोलीस अंमलदार हनुमंत ढोबळे, यांनी आरोपी सह मध्यप्रदेश येथे जाऊन आरोपीकडून ८ लाख २० हजार ४७९ रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली ५ लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार असा एकूण १३लाख २० हजार ४७९ रुपये किमतीचा मध्यमात जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी माननीय. पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल मांडवे साहेब, पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाफ साहेब यांचे मार्गदर्शन खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे, पोलीस हवालदार संजय नाडेकर, पोलीस हवालदार शेखर भोईर, पोलीस हवालदार राजेश नलावडे, पोलीस हवालदार नंदकुमार आढारी, पोलीस हवालदार प्रणय कुमार उकिरडे, पोलीस हवालदार शरद कुलवडे, पोलीस अंमलदार योगेश रोडे, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार हनुमंत ढोबळे, पोलीस अंमलदार सुनील काठे, पोलिस अंमलदार प्रवीण गर्जे,पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार लखन माने, यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास मंचर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर हे करीत आहेत.