DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- प्रा. नागेंद्र जाधव, संदिप सकट
बेळगाव :- वेंगुर्ला राज्य मार्गावरील नागनवाडी ता. चंदगड येथील हनुमान मंदिरा समोरील वळणावर बुधवार दि.१२ जून २०२४ रोजी रात्री ९.४५ वा च्या सुमारास ट्रक चालकाने बेदरकारपणे, हयगईने, भरधाव विरुद्ध दिशेने ट्रक चालवून समोरून येणाऱ्या मारुती सुझुकी इरटीका गाडीला धडक देवून अपघात केला. त्यात अज्ञात ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे.
फिर्यादी गणेश भिकाजी कोयंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार चिरा भरलेला ट्रक क्र. KA22 – C – 1269, या ट्रकगाडीच्या चालकाने बेदरकार, भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने गाडी चालवून समोरून येणाऱ्या मारुती सुझुकी इरटीका कार क्र. MH07 – AG – 6169 या गाडीला धडक दिली यात फिर्यादीची मेहुणी व चुलत मेहुणा जखमी झाले आहेत. यात ट्रक चालकाच्या भरधाव व निष्काळजीपणे गाडी चालविल्याने ट्रक चालकाच्या स्वतःच्या मृत्यूस व ट्रक गाडीच्या नुकसानीस कारणीभूत असल्याची फिर्याद गणेश भिकाजी कोयंडे मु. पो. देवगड जि. सिंधुदुर्ग यांनी चंदगड पोलीस ठाणेत दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीवरून गु. र.221/2024 भा. द. वि. कलम 304 A ,279,337,338,427 व मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास चंदगड पोलीस ठाण्यातील पो. हे. कॉ. 1436 पाटील करीत आहेत.