नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

महीला पुन्हा चुलिकडे वळण्याच्या मार्गावर,
उज्वला योजना आता परवडेना

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले


भिवापूर: चारशे रुपयात मिळणाऱ्या गॅसचे भाव दुप्पट म्हणजेच ८३० रुपयाच्या घरात पोहोचल्याने ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील महिलांना तो परवडेनासा झाला आहे. उज्वला योजनेअंतर्गत १०० रूपयात मिळालेला गॅस महाग झाल्याने झाल्याने महीला पावसाळा अगोदर जंगलात जाऊन वणवण भटकंती करत इंधन डोक्यावर आणून चुली पटविण्याचे नियोजन करतांना दिसत आहे.
     ग्रामीण भागातील महिलांना चुलीच्या धुर पासून मुक्त करण्यासाठी दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत शंभर रुपयात गॅस कनेक्शन देवून केंद्र सरकारने मुक्तता केली.
  त्यावेळी तालुक्यातील हजारो दारिद्रय रेषेखालील महिलांना गॅस मिळाला. परंतू गॅसच्या वारंवार होणाऱ्या भाव वाढीमुळे गरीब कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडले आहे.

       भाव वाढवून सबसिडी घटविली
   जसजशी गॅसची दरवाढ होत गेली, तस तशी मिळणारी सबसिडी कमी होत गेली. ७०० रुपयांना  मिळणारा सिलेंडरवर ३०० रूपये सबसिडी मिळत होती. आता गॅस चा भाव ८३० रूपये गेल्यावर सबसिडी मात्र फक्त १० रूपये मिळत आहे. ही एक गरिबांची थट्टाच आहे अशी प्रतिक्रिया उज्ज्वला लाभार्थ्यांनी दिली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:08 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!