DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री: भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावणारे, जगाला अहिंसेचा मार्ग दाखविणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी(बापू) व जय जवान जय किसान चा नारा देणारे,स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची १५५ वी जयंती देशभर २ ऑक्टोंबर रोजी साजरी करण्यात आली त्याच पार्श्वभूमीवर साक्री तालुक्यातील शेवाळी (दा.) ग्रामपंचायत कार्यालयात गावाच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सौ. सुरेखा दत्तात्रय साळुंके यांच्या हस्ते दोन्ही राष्ट्रपुरुष यांचे प्रतिमा पूजन, फुल हार अर्पण करीत अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली अशा वेळी ग्रामविकास अधिकारी मनोहर सोनवणे यांच्या वतीने उपस्थित ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ यांना स्वच्छतेचे महत्व सांगून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा करून घेतली या वेळी उपसरपंच केतन साळुंके, माजी उपसरपंच तथा ग्रा.प. सदस्य पंढरीनाथ साळुंके, माजी सरपंच तथा सदस्य मच्छिंद्र गायकवाड, सदस्य दादा बागुल,ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र सूर्यवंशी, विजय माळचे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.