DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:-अकिल शहा
साक्री:- धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कावठे शिवारात नवरा बायको चे भांडण सोडवायला गेलेल्या सासूला जावयाने लाकडी दांडक्याने मारहाण करीत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
साक्री पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.०६/१०/२०२४ रविवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास कावठे शिवारातील खडी क्रेशर जवळ जयश्री सोनवणे व त्यांचे पती कैलास सोनवणे यांच्यात काही कारणास्तव भांडण सुरु झाले भांडण मिटविण्यासाठी सासू अरुणाबाई माळचे व सासरे राजेंद्र माळचे (रा.वासखेडी) ता. साक्री गेले असता तेंव्हा त्यांना जावई कैलास सोनवणे यांच्या वतीने सासू आणि सासऱ्याला लाकडी दांडक्याने पायावर व डोक्यावर मारहाण केली या मारहाणीत सासू अरुणाबाई माळचे यांनी डोक्यात लाकडी दांडका मारल्याने ते जमिनीवर कोसळले त्यांना परिसरातील नागरिकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालय साक्री येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरी मॅडम यांनी तपासून मयत घोषीत केले.
घटनेची माहिती मिळताच उप विभागीय पोलीस अधिकारी संजय बाबंळे, प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल बागुल सह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती जाणून घेतली आरोपी कैलास सोनवणे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी जयश्री सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भान्यांस १०३(A),११८(२),३५२ प्रमाणे साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास साक्री पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक साळुंके करीत आहेत.