DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
नागपूर :- महायुतीतील उमेदवार, नेते आपल्याला विचारत नाही, प्रचार यंत्रनेत सहभागी करुन घेत नाही. अशा तक्रारींचा पाढा शुक्रवारी (दि. 9) महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांच्यासमोर वाचला. अशीच स्थिती राहिल्यास आम्ही वेगळी वाट धरू असा इशाराही यावेळी काही संतप्त पदाधिकाऱ्यांनी गुजर यांना दिला.
महायुतीतितर्फे सहा विधानसभा मतदार संघांपैकी रामटेक वागळता अन्य पाच ठिकाणी भाजप निवडणूक लढवीत आहे. रामटेकची जागा शिंदे सेनेच्या वाट्याला गेली असून आशिष जैस्वाल उमेदवार आहेत. सहा पैकी एकही जागा अजित पवार गटाच्या वाट्याला आलेली नाही. त्यामुळे दादांच्या राष्ट्रवादीत नाराजी आहे. भाजप सेनेचे उमेदवार आणी नेते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रचार यंत्रनेत सहभागी करुन घेत नसल्याने त्या नाराजीत आणखी भर पडलेली आहे. ही नाराजी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांच्या समोर व्यक्त केली. युतीत सहभागी असलेल्या पक्षात समन्वय असावा यासाठी सहाही विधानसभा क्षेत्रासाठी समन्वयकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र या समन्वयकांना भाजप सेनेच्या उमेदवा्रांकडून विश्वासात घेतले जात नसल्याची कैफियत त्यांनी गुजर यांच्यापुढे मांडली. या शिवाय प्रचारानिमित्य जिल्ह्यात येणाऱ्या पक्षाच्या जेष्ठ नेत्यांच्या कार्यक्रमापासूनही राष्ट्रवादीला अंधारात ठेवल्या जात असल्याच्या तक्रारी पदाधिकाऱ्यांनी केल्या. युतीतील उमेदवार आणी नेते यांच्या वागणुकीत बदल नाही झाल्यास नाईलाजाने आम्ही वेगळा मार्ग स्वीकारू असा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान युतीतील वरिष्ठ नेत्यांना परिस्थितीशी अवगत करुन देण्याचे आश्वासन गुजर यांनी कार्यकर्त्यांना देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी युवकचे जिल्हाध्यक्ष चौहान, उमरेड विधानसभेचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पुंडलिक राऊत, रामटेक विधानसभा अध्यक्ष अरविंद अंबागडे, कामठी विधानसभा अध्यक्ष आशिष पाटील, हिंगणा विधानसभा अध्यक्ष भागवत खंगार, तसेच तालुका अध्यक्ष कळमेश्वर भुजंग भोजनकर, मौदा तालुका अध्यक्ष अरुण मदनकर, उमरेड तालुका अध्यक्ष रमेश युवनाते, भिवापूर तालुका अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर समर्थ, हिंगणा तालुका अध्यक्ष बिरु सिंग तोमर, नागपूर ग्रामीण तालुका अध्यक्ष पांडुरंग गायकी, कुही तालुका अध्यक्ष नामदेव आंबीलदुके, काटोल तालुका अध्यक्ष विवेक चिचखेडे, पारशिवनी तालुकाध्यक्ष सचिन आंमडे व नागपूर जिल्हा मीडिया सेल अध्यक्ष दिलीप सांनगडीकर, उमरेड शहराध्यक्ष कैलास वरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो – जिल्हाध्यक्ष गुजर यांच्यासमोर तक्रारिंचा पाढा वाचताना राकाँ चे पदाधिकारी