DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- संजय दिंडे
कोल्हापूर:- चंदुर तालुका हातकणंगले येथील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे दोन कर्मचारी ५००० हजाराची लाच प्रकरणी कोल्हापूर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. यातील
लोकसेवक रज्जाक हुसेन तांबोळी, वय ५०, पद लाईनमन, मराविवि शाखा कार्यालय चंदुर, रा. हुसेन मंजील बंगला भारतनगर, इदगहा जवळ गल्ली नं १, मिरज, ता. मिरज, जिल्हा सांगली, व आकाश शंकर किटे, वय ३३ बाह्यस्त्रोत कर्मचारी,, मराविवि शाखा कार्यालय चंदुर, रा. धुळेश्वर नगर गल्ली नं ५ कबनूर, ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. यांनी तक्रारदार हे इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर असुन लाईट फिटींगचे तसेच ग्राहकांना इलेक्ट्रीक चे अनुशंगाने असलेली सर्व कामे मंजूर करण्याची कामे करतात. तक्रारदार यांचे ग्राहक हकीब पानारी रा. इचलकरंजी यांचे शाहुनगर इचलकरंजी येथे पॉवरलुम सुरू करण्याचे असल्याने तक्रारदार यांचे वतीने महावितरण कार्यालय चंदुर येथे कनेक्शन मिळण्यासाठी अर्ज केला होता . तसेच कनेक्शन घेण्याकरीता आवश्यक कार्यालयीन बाबीची पुर्तता करणेरकीता ग्राहक यांचे सोबत करार करून सर्व कागदपत्रांची पुर्तता करून २६ एचपीचे पॉवरलूम कनेक्शन मंजुर करून घेतले .ग्राहक यांचे शेडमध्ये इलेक्ट्रीक पेटी, मिटर इत्यादी जोडलेले होते .शेडमध्ये इलेक्ट्रीक पोलवरून मिटर मध्ये कनेक्शन जोडणे बाकी होते. त्याकरीता दिनांक ३०/१०/२०२४ रोजी तक्रारदार यांनी महावितरण चंदुर कार्यालयात जावून लाईनमन तांबोळी यांना भेटले . त्यावेळी त्यांचे सोबत वायरमन आकाश किटे हे होते. तक्रारदार यांना इलेक्ट्रीक पोलवरून मिटरपर्यंत लाईट जोडणी करून देतो. परंतु त्यासाठी ७००० रूपये तांबोळी यांना दयावे लागतील नाहीतर कनेक्शन जोडणार नाहीत असे सांगीतले त्यावेळी तक्रारदार यांनी काहीतरी कमी करण्यास सांगीतले . लाईनमन रज्जाक तांबोळी यांनी ५००० रूपये दया त्यानंतर कनेक्शन लगेच जोडली जाईल असे सांगितले. त्याबाबतची तकार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर येथे दिली.
तकारदार यांनी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे दिलेल्या तक्रार अर्जाप्रमाणे अधिकारी यांनी पडताळणी केली असता पडताळणीमध्ये तक्रारदार यांचे पॉवरलुमचे शेडमध्ये इलेक्ट्रीक पोलवरून मिटर मध्ये कनेक्शन जोडणे करीता बाहयस्त्रोत कर्मचारी आकाश किटे यांनी प्रथम ५००० रूपयामध्ये तडजोड करून ३००० रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले . लाईनमन रज्जाक हुसेन तांबोळी यांचे लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता रज्जाक हुसेन तांबोळी यांनी ५००० रूपयांची लाच मागणी केलेचे निष्पन्न झाले.रज्जाक हुसेन तांबोळी, वय यांनी ५,००० रूपये लाच रक्कम स्विकारलेने त्यांना रंगेहाथ पकडणेत आले. याबाबत रज्जाक तांबोळी व आकाश किट्टे यांचे विरूध्द शिवाजीनगर पोलीस ठाणे, इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला. पोलिस हेड कॉन्स्टेबल अजय चव्हाण, सुनिल घोसाळकर, पोलिस नाईक सुधीर पाटील, पोलिस कॉन्स्टेबल कृष्णात पाटील, चालक सहाय्यक. फौजदार गजानन कुराडे कोल्हापूर यांनी केली आहे.