नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

वन विभागाने विनापरवाना लाकूड वाहतूक करताना, मुद्देमालासह तीन आरोपी पकडले

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- संदिप सकट

कोल्हापुर:- उमगाव व जांभळे शिवारात वनविभागाचे अधिकारी ग्रस्त घालत असताना ट्रॅक्टर ट्रॉली सह विनापरवाना लाकूड वाहतूक करताना आढळून आले. कृष्णा डेळेकर (वनपाल चंदगड), मौलामुबारक सनदी (वनरक्षक जांबरे) हे फायर वॉचर विठ्ठल धुरी, सौरभ सावंत यांचे समवेत नियतक्षेत्र उमगाव व जांबरे मध्ये गस्त घालत असताना मौ. जांबरे – उमगाव रस्त्या दरम्यान मौजे जांबरे गावचे हद्दीत ट्रॅक्टर नं MH-09-CJ-6140, दोन चाकी विना नंबरची ट्रॉली मधून मनाई बिगर मनाई जातीचे जळाऊ लाकूड मालाची विनापरवाना वहातूक करत असताना विशाल अशोक कुंदेकर (ट्रॅक्टर चालक) व अशोक महादेव् कुंदेकर (ट्रॅक्टर मालक) मिळून आले. मोक्यावर त्यांचेकडे लाकूड वाहतूक पास ची विचारणा केली असता ते वाहतूक पास परवाना दाखवु शकले नाहीत. तसेच त्यांचेकडे अधिकची चौकशी केली असता त्यांनी चंदगड येथील बशीर रसूल मदार यांनी मौजे जांबरे येथील खरेदी केलेल्या झाडापासून उत्पादीत जळाऊ लाकूड मालाची बशीर मदार यांचे सांगणे नुसार विनपरवाना वाहतूक केलेचे सांगितले. त्यानुसार सदरचा ट्रैक्टर, ट्रॉली व जळाडू लाकूड माल जप्त करून ताब्यात घेऊन चंदगड मध्यवर्ती रोपवाटीका येथे जमा करून वनरक्षक जांबरे यांनी आरोपी विरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत वन गुन्हा नोंद केला. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास श्री. जी. गुरुप्रसाद ( उपवनसंरक्षक कोल्हापूर), नवनाथ कांबळे (सहाय्यक वनसंरक्षक कोल्हापूर) यांचे मार्गदर्शन खाली नंदकुमार भोसले (वनक्षेत्रपाल चंदगड), कृष्णा डेळेकर (वनपाल चंदगड), मौलामुबारक सनदी (वनरक्षक जांबरे) हे करत आहेत.

जप्त मुद्देमाल

1) ट्रैक्टर नं. MH – 09- CJ -6140 ,किंमत – 4,00,000/-

2) दोन चाकी ट्रॉली – (विना नंबर) , किंमत 1,00,000/-

3) मनाई बिगर मनाई जळाऊ लाकूड – 6.336 घ.मी ,
मा.की. 3823/-

आरोपी नावे
1) विशाल अशोक कुंदेकर, व.व 25, रा. शिरगांव, ता. चंदगड

2) अशोक महादेव कुंदेकर, व. व.52, रा.शिरगांव, ता.

3) बशीर रसूल मदार, व.व 58, रा. चंदगड

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:29 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!