नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

लातूर जवळ भीषण अपघातात भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा मृत्यू

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- रायप्पा मंडले

लातूर – औसा रोडवर बेलकुंड गावाजवळ कार उलटून झालेल्या भीषण अपघातात भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी आहे. हा अपघात आज दुपारी ४. १९ वाजेच्या दरम्यान झाल्याची माहिती आहे. देशमुख हे माजलगाव मतदारसंघात २०१४ ते २०१९ साली आमदार होते.
माजलगावचे माजी आ. आर. टी. देशमुख हे आपल्या कारने ( क्र. एमएच ४४ एडी २७९७) तुळजापूरमार्गे लातूरकडे येत होते. दुपारी ४:१९ वाजता बेलकुंडनजीक असलेल्या उड्डाणपुलावरून काही अंतरावर कार पुढे आल्यावर रस्त्यावर साचलेले पाणी कारच्या काचेवर पडले. त्यामुळे चालकाचा भरधाव कारवरील ताबा सुटला. बाजूस असलेल्या रस्त्याच्या कठड्याला कार जोरात धडकली. अपघातात कार चारवेळा पलटी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यात कारचालक व सोबत असलेले माजी आ. आर. टी. देशमुख गंभीर जखमी झाले होते. दोघांनाही रुग्णवाहिकेतून लातूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, रस्त्यातच माजी आ. आर. टी. देशमुख यांचा मृत्यू झाला. चालकावर उपचार सुरू आहेत. अपघात एवढा भीषण होता की गाडीचा चेंदामेंदा झाला आहे.
जिजा म्हणून होते परिचित
जिजा म्हणून सर्वत्र परिचित असलेले आर. टी. देशमुख हे माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. २०१४ मध्ये माजलगावामध्ये राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांचा देशमुख यांनी जवळपास ३७ हजार मताधिक्क्याने पराभव केला होता. त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने एक अनुभवी व प्रगल्भ नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
गाडीने उड्डाणपुलाच्या दुभाजकाचे कठडे तोडले चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर चारचाकी रस्त्याच्या बाजूला उलटली. गाडीने दोन ते तीन पलट्या घेतल्याची माहिती आहे. गाडीतील चालक आणि माजी आमदार देशमुख दोघेही गंभीर जखमी झाले. जवळच असलेल्या पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ १०८ रुग्णवाहिकेस पाचारण केले. पोलिस आणि इतर वाहनधारकांनी गंभीर जखमी दोघांना गाडीतून बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या देशमुख यांना तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
5:00 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
18 %
5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!