मृतदेह ओळख पटवण्यासाठी उदगीर येथील शीतगृहात ठेवण्यात आले.
DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- नारायण कांबळे
आंध्रप्रदेश तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र राज्याच्या सीमावरती भागातील तेलगू कन्नडमध्ये बोलणारी भाषेतील अनोळखी महिलेचे मृत अवस्थेत जळकोट ग्रामीण रुग्णालयांमध्ये पोलिसांना मिळून आली आहे या मयत महिलेचा उदगीर जिल्हा लातूर उपजिल्हा रुग्णालयातील शवग्रहात मृतदेह ठेवण्यात आलेला आहे पोलिसांकडून नातेवाईकाचा शोधा शोध घेत आहेत. या विषयी माहिती मिळाल्यास जळकोट पोलीस ठाण्याची संपर्क साधा व असे आवाहन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांनी केले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पो.स्टे. जळकोट अ.मृ.नं.१५/२०२४ कलम १९४ बी.एन.एस.मधील अनोळखी स्त्री ही दि.२७/०४/२०२५ रोजी १०.१५ वाजताचे पुर्वी ग्रामीण रुग्णालय, जळकोट येथे मृत आवस्थेत दाखल झाले बाबतचे एम.एल.सी.पत्रक प्राप्त झाल्याने पो.स्टे.ला नमुद प्रमाणे अ.मृ. नोंद करुन सदर अ.मृ.चा तपास आम्ही करीत आहोत.
सदर अ.मृ.मधील अनोळखी मयत स्त्री चे प्रेताचे दि.२७/०४/२०२५ रोजी ग्रामीण रुग्णालय, जळकोट येथे पी.एम. करण्यात आले असुन तिची ओळख पटविणे व तिचे नातेवाईकांचा शोध घेणे कामी तिचे प्रेत सामान्य रुग्णालय, उदगीर येथे शितगृहात ठेवण्यात आले आहे.
सदर अ. मृ.मधील अनोळखी मयत स्त्री चे वर्णन खालील प्रमाणे :-
१. वय-अंदाजे ३५ वर्ष वर्ण-काळा सावळा, उंची अंदाजे पाच फुट , डोकीस काळे लांब केस , दोन्ही नाकात-पिवळे धातुच्या मोरणी , अंगात राखाडी रंगाचा फुल बाहयाचा शर्ट, हिरवे रंगाचा परकर, कमरेस लालसर रंगाची टॉवेल गुंडाळलेला व उजवे हाताचे मनगटात काळा दोरा बांधलेला, भाषा तेलगु भाषिक असल्याचे समजले आहे.
तरी वरील वर्णनाचे मयत स्त्री चे नातेवाईकांचा शोध चालू असून सर्व वर्तमान, पोम्प्लेट जाहीरात देवून तिचे नातेवाईकांचा शोध होवून तिचे नातेवाईक मिळुन आल्यास त्यांना पो.स्टे. जळकोट जि. लातूर येथे संपर्क साधावा असे आव्हान जळकोट पोलीस ठाण्याकडून केले आहे. सचिन चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक मोबाईल नंबर:-9011304580 यावर संपर्क करावा असे कळवण्यात आले आहे.



