नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जि.प. सदस्यवाढीसाठी आज-यातील सर्वपक्षीय एकवटले बैठकीत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा, मंत्री, आमदारांना शिष्टमंडळ भेटणार

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- तानाजी भोकरे

आजरा:- आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य संख्या तीन ऐवजी दोन करण्यात आली आहे. हा तालुक्यावर अन्याय असून याविरोधात तालुक्यातील सर्वपक्षीय एकवटले असून नगरपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पालकमंत्री, मंत्री व आमदारांना भेटून निर्णय रद्द करण्याची मागणी करण्याचे ठरले.
यावेळी भाजपचे उपाध्यक्ष व अण्णा भाऊ समूहाचे प्रमुख अशोक चराटी म्हणाले विधानसभेत तीन छकले तालूक्याचे पडले आहेत. याचा विकासावर परिणाम होत आहे. त्यात तीन ऐवजी दोन जिल्हा परिषद मतदारसंघ करून जखमेवर मीठ चोळले आहे. याबाबत शुक्रवारी जिल्हाधिका-यांची भेट घेणार आहे.शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई म्हणाले, सत्ताधारी मंडळींनी यामध्ये लक्ष घालून आजरा तालुक्यावरील अन्याय दूर करावा.
राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमेश आपटे म्हणाले,१९९२ मध्ये चार सदस्य होते. त्यानंतर तीन झाले आता दोन झाले आहेत. कमीत कमी दोन तर जास्तीत जास्त ७५ आहे. संख्या वाढविण्यासाठी जिल्हाधिका-यांना अधिकार आहे. शुक्रवारी सर्व मंत्री उपस्थित असल्याने भेट घेऊन सदस्यवाढीसाठी प्रयत्न करावा. यावेळी राजू होलम, प्रकाश कोंडूसकर यांचीही भाषणे झाली. सी आर देसाई यांनी निवेदन वाचून दाखवले.
यावेळी संभाजी पाटील, अभिषेक शिंपी,उदयराज पोवार, राजेंद्र सावंत, रमेश रेडेकर,जनार्दन टोपले, दशरथ अमृते, बाळ केसरकर, रणजित सरदेसाई, विक्रम देसाई आदी उपस्थित होते. युवराज पोवार यांनी आभार मानले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
12:54 pm, April 18, 2026
38°C
घनघोर बादल
12 %
13 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:09 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!