नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

आधुनिक तंत्रज्ञानाने शेतीत प्रगती : तहसीलदार राजेश चव्हाण

चंदगडला कृषी दिनी शेतक-यांचा सत्कार

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- ताजुद्दीन मंगसुळी

चंदगड:- आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती व्यवसायात आमूलाग्र बदल झाले असून त्यामुळे शेतक-यांना फायदा झाला आहे. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शेतक-यांना उपलब्ध होत आहे. त्याचा वापर करून शेतीत प्रगती साधायला हवी, असे मत तहसीलदार राजेश चव्हाण यांनी व्यक्त केले. येथील तालुका कृषी विभाग व पंचायत समितीच्या कृषी विभागातर्फे कृषी दिन झाला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी वृषाली यादव उपस्थित होत्या. प्रारंभी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्य प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी पीक स्पर्धेत राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर क्रमांक मिळवलेले सुरेश चांदेकर कुर्तनवाडी, रावजी गोरल करंजगाव, हणमंत गावडे नांदवडे, इंदुबाई गावडे करंजगाव, तुकाराम मुरकुटे मुरकुटेवाडी, अमृत पाटील नांदवडे, दिलीप गावडे सुळये, शिवलिंग गावडे हंबीर, विलास पाटील शिवणगे, अर्जुन चिमणे सुळये, संतू शेनोळकर करेकुंडी, निवृत्ती डुरे आंबेवाडी, अनिला दळवी करंजगाव आदी शेतक-यांचा सत्कार झाला.मंडल कृषी अधिकारी सतीश कुंभार, कृषी विस्तार अधिकारी नरेंद्र कुंभारे, अशोक गडदे, दत्तात्रय कदम,जीवन पालमपल्ले, डी.बी. जाधव, बाबूराव हळदणकर आदींनी मनोगते व्यक्त केली. उपकृषी अधिकारी एस. डी. खुटवड, सहाय्यक कृषी अधिकारी शुभम पाटील, दुबे, भगत यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. सहाय्यक कृषी अधिकारी किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विस्तार अधिकारी संजय राठोड यांनी आभार मानले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:10 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!