DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी. विलास शिंदोळकर
कर्नाटक:- बेळगाव येथील सरदार्स हायस्कूल मैदानावरील गॅलरी नजीक थांबून गांजाची विक्री करणाऱ्या एकाला सोमवार दिनांक 14 रोजी खडेबाजार बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे. असिफ अब्दुलगणी हुबळीकर (वय 38) रा. गुलजार गल्ली न्यू गांधीनगर, बेळगाव असे त्याचेनाव आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 12000 रुपये किमतीचे 0. 460 ग्राम वजनाचा गांजा, दोन हजार रुपये किमतीचा मोबाईल, 20000 रुपये किमतीची मोटरसायकल आणि 270 रुपये रोख असे एकूण 34 हजार 270 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खडेबाजार पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या सरदार्स मैदानावरील गॅलरीजवळ थांबून एक जण गांजाची विक्री करत असल्याची माहिती खडेबाजार पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक आनंद अदागोंड व त्यांच्या सहकार्यानी सदर ठिकाणी छापा टाकून वरील संशयिताला अटक केली आहे. त्यांच्याकडून गांजा, मोबाईल, मोटरसायकल व रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्या विरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



