DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- विलास शिंदोळकर
कर्नाटक:- बेळगाव कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्यासह राज्यातील 35 अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या आहेत. बदलीचा आदेश सोमवार दिनांक 14 रोजी अधिकृत जारी करण्यात आला आहे बदलीतील ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यानी तातडीने पदभार स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलीस उपायुक्त म्हणून रोहन जगदीश यांनी 2023 मध्ये पदभार स्वीकारला होता ते 2019 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची बदली गदग जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून करण्यात आली आहे. या बदलीचा यादीत 35 इतर अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. यापूर्वी बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून काम पाहिलेले डॉ. चंद्रगुप्त यांची पोलीस महानिरीक्षक उत्तर परिक्षेत्र गुलबर्गा, बेळगावचे तात्कालीन पोलीस आयुक्त येडा मार्टीन मार्बन्याँग यांची अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) पोलीस मुख्यालय, बेंगलोर येथे बदली करण्यात आली आहे. बेळगावचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांची बदलीच्या ठिकाणी कोणाची वर्णी लागणार बाबत उत्सुकता आहे.



