नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून, पतीने घेतले स्वतःला जाळून

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- साईनाथ खंडेराय

पत्नी व तिच्या प्रियकराला पोलिसांनी घेतले ताब्यात व आरोपींना दोन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.

नांदेड :- बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मौजे अर्जापूर येथील आनंदा जाधव याने आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आपल्या राहत्या घरी दिनांक 20 रोजी स्वतः जाळून घेतल्यामुळे त्यात ते गंभीर रित्या भाजून त्यांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला कारणीभूत असलेल्या त्यांच्या पत्नी व तिच्या प्रियकराला कुंडलवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे….

कुंडलवाडी शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या अर्जापूर येथील आनंद हणमंतराव जाधव वय 40 वर्ष यांच्या पत्नीचे गावातीलच एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते, या अनैतिक संबंधामुळे आनंदा व त्यांच्या पत्नीमध्ये सतत घरामध्ये भांडणे होत असत, पत्नीच्या सततच्या अनैतिक संबंधमुळे व्यतित होऊन आनंदा जाधव याने आपल्या राहत्या घरी दिनांक 20 रोजी रात्री अकरा वाजता स्वतःच आग लावून घेतल्यामुळे त्यात ते गंभीररित्या भाजल्यामुळे त्यांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदरील घटनेची फिर्याद शामराव हणमंतराव जाधव 45 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार अर्जापूर यांच्या फिर्यादीवरून या मृत्यूला कारणीभूत असलेल्या पत्नी राजश्री आनंदा जाधव वय 33 वर्ष, व्यवसाय घरकाम, राहणार अर्जापूर व तिचा प्रियकर शंकर लिंगप्पा पांचाळ वय 52 वर्ष राहणार अर्जापूर या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर हे करीत आहेत….

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:04 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!