मनुष्याला जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी पाहिजे असते. त्यासाठी त्याला आपल्या मनाप्रमाणे काम करायला स्वातंत्र्य पाहिजे असते. पण स्वातंत्र्य हे योग्य काम करण्यासाठी पाहिजे असते. कोणाचा खून करायला नाही. हे सर्व साध्य करण्यासाठी मानवाला हजारो वर्ष संघर्ष करावा लागला. सुरूवातीला एक माणूस स्वतंत्र होता आणि बाकी सर्व गुलाम होते. एक राजा होता आणि बाकी सर्व प्रजा होती. पण मानवाच्या उत्क्रांतीमध्ये, स्वातंत्र्यासाठी संघर्ष झाला. त्यातून मानव पुढे आला. मग सरंजामशाही आली. काही लोकांना स्वातंत्र्य मिळालं आणि बाकी सर्व या मुठभर लोकांसाठी काम करणारे गुलाम झाले. राजे, राजवाडे, जहांगीरदार , वतनदार झाले आणि बाकी सर्व त्यांच्यासाठी काम करणारे कामगार किंवा रयत झाले. परत संघर्ष झाला आणि त्यातून उदयास आली ती भांडवलशाही. म्हणजे पैशात ताकद आली, राजे राजवाडे यांची सत्ता कमी कमी होत गेली. आणि ज्यांच्या हातात उत्पादनाची साधने होती ते श्रीमंत होत गेले बाकी सर्व कामगार झाले. पगार मिळायला लागला. कुठल्याही जाती धर्माचे असो पण जनता दोन वर्गात विभागली गेली. त्यातूनच संघर्षातून लोकशाही निर्माण झाली. जिथे सर्वांना समान हक्क आणि समान न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही प्रक्रिया १६४९ सालापासून सुरू झाली. इंग्लंडचा राजा जेम्सला, भर चौकात सुळावर लटकवले. लोकसभेचे राज्य आले. त्याच संकल्पनेतून शिवराज्य निर्माण झाले. छत्रपती शिवरायांनी वतनदारी नष्ट केली, जमीनदारी नष्ट केली. खऱ्या अर्थाने जगात पहिल्यांदाच रयतेचे राज्य शिवराज्य स्थापन केले. क्रांती होते तेव्हा प्रतिक्रांती सुद्धा होते आणि त्यामुळे पुढच्या काळात शिवराज्य नंतर देखील परत वतनदारी आली आणि परत जनता गुलाम झाली.
त्यातच पुढे जाऊन संघर्ष झाला. पुढे महात्मा फुले, शाहू, आंबेडकर ही तत्त्वप्रणाली जन्माला आली भारताच्या स्वातंत्र्या मध्ये संविधानाची निर्मिती झाली. कायदेशीर रित्या सर्व नागरिकांना समान न्याय समान हक्क मिळू लागला. पण परत प्रतिक्रांती झाली व उदारमतवादी तत्व प्रणाली निर्माण झाली. तात्विक दृष्ट्या तरी याचा अर्थ सर्वांना स्वातंत्र पाहिजे आणि सरकारने आर्थिक आणि सामाजिक कामांमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. १९७० साली अमेरिकेत रोनाल्ड रीगन आणि इंग्लंड मध्ये मार्गरेट थेचर नी ही राजवट आणली आणि सामाजिक व आर्थिक बाबतीत सर्वांना सूट द्यायची कल्पना कार्यरत होऊ लागली. त्यात कल्याणकारी राज्याची समाप्ती झाली. जनतेला मिळालेले सर्व अनुदान थांबवण्यात आले. त्यातच प्रतिक्रांती म्हणजे अमेरिकेने आपली आर्थिक प्रणाली भारतावर थोपवली. आणि आज नवा उदारमतवाद हा भारतात लागू झाला आहे. त्यातून सरकारचा अर्थकारणावरील हस्तक्षेप कमी कमी होत चाललेला आहे व मानवाला म्हणजेच भांडवलदारांना मुक्तपणे आपले काम करता येत आहे. त्यालाच खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण (खाउजा) म्हणतात. यात लोकांची कल्याण करण्याची सरकारची जबाबदारी कमी कमी होत चालली आहे. कल्पना अशी आहे की, सरकार काहीच करणार नाही. बाजार पेठ आर्थिक निर्णय घेईल. परिणामत: अंबानी आणि दाऊद इब्राहिम जगातल्या पहिल्या दहा श्रीमंत लोकांमध्ये गेले आणि आपलं काय झालं ते सर्वांनाच माहिती आहे. लोकांनी ह्या गोष्टी कडून आपले लक्ष वळवण्यासाठी हिंदू-मुसलमान संघर्षाची एक नशा देण्यात आली आहे. जाती-धर्मांमध्ये युद्ध निर्माण करून जगाच्या सर्व राष्ट्रांमध्ये खऱ्या विषयापासून दूर नेऊन मूठभर लोक पुन्हा राज्य करू लागले आहेत. अंबानी – आडाणी चे राज्य म्हणजे अमेरिकेचे राज्य. आंतरराष्ट्रीय भांडवल शाही अत्यंत क्रूर असते ती विरोध सहन करत नाही. जसे भारताचे सी डी एस रावत यांची अचानक काही कारण नसताना हत्या झाली ज्याला अपघात म्हणतात. कारण बिपीन रावत यांनी हत्यारे परदेशातून घ्यायची नाहीत ही भारतातच बनली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली. तिला जगातल्या सर्व चंद्रस्वामी आणि त्यांच्या वंशाच्या लोकांनी विरोध केला परिणाम त्याचे काय झालं ते आपल्याला दिसत आहेत. म्हणून हा संघर्ष जो आता चालू आहे तो श्रीमंत आणि गरीबांमध्ये संघर्ष चालू आहे. सर्वांच्या स्वातंत्र्यासाठी तो चालू आहे त्यातून एक नवीन भारत उदयास येणार आहे. काही लोक आपल्या हक्कासाठी आपल्या स्वातंत्र्यासाठी लढणार आहेत त्याला क्रांती म्हणतात. क्रांती झाल्यावर प्रतिक्रांती होते आणि परत संघर्षातून मानव पुढील पायरी गाठतो. हा संघर्ष मानवाच्या जीवनामध्ये कायम होत राहणार जोपर्यंत समाजात ते संघर्ष संपवणार आणि मानव मुक्त होणार. ही प्रक्रिया गेली दहा हजार वर्ष सुरू आहे. आणि मानव आज एका टप्प्यावर येऊन उभा आहे. अंबानी अडाणीच्या प्रती क्रांतीला आता आपल्याला विरोध दिसू लागला आहे. उगाच नाही शेतकऱ्यांनी एक वर्ष संघर्ष केला आणि विजयी झाले. एसटी कामगारांचा प्रचंड संघर्ष सुरू आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी देशभर खाजगीकरणाचा विरोधात बंड केले आणि तो आता संघर्ष फार मोठा होणार आहे.
जनतेच्या मालकीचे कारखाने आणि उद्योग कवडीमोल भावामध्ये भांडवलदारांना देण्यात येत आहेत. एसटीचे खाजगीकरण, शाळेचे खाजगीकरण, आरोग्याचे खाजगीकरण, रेल्वेचे खाजगीकरण हे सर्व खाजगीकरण करण्याचा सपाटा सर्व पक्षांनी भारतात लावला आहे. कारण भारतामध्ये निवडून आलेल्या सरकारची सत्ताच नाही. गुप्तहेर खात्यातील सर्व प्रमुखांच्या समितीने जाहीरच केले. भारतामध्ये माफिया टोळ्या भ्रष्ट राजकारणी आणि अधिकारी यांची समांतर सत्ता प्रस्थापित झाली आहे. आणि संविधानावर आधारित सत्ता ही फक्त देखावा आहे. ह्या प्रतिक्रांतीला उत्तर समाजातूनच येणार आहे आणि त्यासाठी वर्गलढा निर्माण पुन्हा एकदा होणार आणि गरीब आणि श्रीमतांमध्ये प्रचंड संघर्ष होणार.
भारतीय विचारधारा मध्ये वर्ग आणि जातीमध्ये एक संघर्ष दाखवण्यात आला आहे. काही लोक म्हणतात की भारतात जाती या सत्य आहे. आणि वर्ग हा वेगळा आहे. वर्गाचे तत्वज्ञान हे पाश्चिमात्य राष्ट्राकडून आले. हे म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये दोनच वर्ग होते. एक वर्ग श्रीमंतांचा, राज्यकर्त्यांचा आणि दुसरा वर्ग सेवकांचा. इतिहासात सुरुवातीला एक राज्यकर्ता वर्ग होता आणि दुसरा गुलामांचा वर्ग होता. त्यानंतर त्याचे परिवर्तन सरंजामशाहीत झाले. म्हणजे एकीकडे राजे सरदार होते आणि दुसरे लोक हे कष्टकारी किंवा सेवक होते. जमीन राजे आणि सरदारांच्या मालकीची होती. त्यावर राबवण्याचे काम सामान्य माणूस करायचा आणि जे उत्पादन होईल त्याचा बराचसा भाग राजा राजवाड्यांना द्यायचा. महाराष्ट्रात थोडक्यात ह्याला वतनदारी म्हणत होते. गावच्या गाव काही व्यक्तींच्या मालकीचे होते. त्याच्यावर राबवण्याचे काम लोक करत होते. शिवरायांनी ही व्यवस्था नष्ट केली. वतनदारी, जहांगीरदार नष्ट करून त्यांनी रयतेचे राज्य शिवराज्य निर्माण केले. म्हणून शिवराय थोर क्रांतिकारक होते. आपल्याला शिवराज्य पुन्हा निर्माण करायचे आहे.
पुढे जाऊन सरंजामशाहीचे रूपांतर भांडवलशाहीमध्ये झाले. म्हणजे एकीकडे औद्योगिक क्रांतीनंतर मालकांची जात निर्माण झाली. ज्यांच्याकडे उत्पादनाचे साधन होते. म्हणून ते मालक झाले, जसे अडाणी, अंबानी, टाटा, बिर्ला हे मालक आहेत आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे लोक हे कामगार आहेत, कष्टकरी आहेत, सैनिक आहेत. म्हणून दोनच वर्ग आहेत एक मालक आणि दुसरा नोकर.
जातीव्यवस्था सुद्धा ह्याच कारणासाठी बनली. चार वर्णात विभागली गेली. त्याचा उद्देश होता की बहुसंख्य समाजाने कष्ट करायचे, काम करायचे आणि मूठभर लोकांची सेवा करायची. फुकट मोलमजुरी करण्यासाठी जात निर्माण झाली ही भारताची पद्धत आहे. ह्यालाच हिंदुत्व म्हणतात. सर्वात उच्च जात म्हणजे ब्राह्मण. त्याची सर्व जगाने सेवा करायची आहे. दुसरी जात म्हणजे क्षत्रिय. त्यांनी समाजाचे संरक्षण करायचे आहे. हातात शस्त्र असल्यामुळे त्यांनी राजाचे आणि जागीरदार याचे रूप घेतले. तिसरा वर्ग वैश्य म्हणजे व्यापाऱ्यांचा आहे. आणि शेवटचा वर्ग हा शूद्रांचा आहे. ज्याचे काम फक्त फुकट मध्ये समाजाची सेवा करण्याचा आहे. हळूहळू उरल्या दोन जाती नष्ट झाल्या. एक म्हणजे ब्राह्मण आणि दुसरा म्हणजे शुद्र. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा देखील राज्याभिषेक करायला नकार देण्यात आला. कारण शिवराय हे शूद्र आहेत आणि ते राजा होऊ शकत नाही, असे धर्ममार्तंडांनी ठरवले. याचा अर्थ असा होतो की दोनच वर्ग निर्माण झाले एक ब्राह्मण आणि एक शूद्र. आधुनिक जगामध्ये याला प्रचंड विरोध निर्माण झाला. तो महात्मा फुलेंच्या चळवळीमुळे. त्याला छत्रपती शाहू महाराजांनी मूर्त स्वरूप दिले व राजाश्रय दिला. म्हणून या चळवळीचा एक सिद्धांत प्रत्यक्षात उतरवला गेला. ज्यातून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या घटनेमध्ये समता, बंधुत्व, न्याय हे तत्त्वप्रणाली कायदा च्या स्वरूपात बदलले.
लेखक: ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाइट :www.sudhirsawant.com
मोबा.नं. ९९८७७१४९२९