माजी आमदार राजूभाऊ पारवे यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपा पक्षप्रवेश पार पडला.
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
नागपुर:- भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी व नेत्यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत काँग्रेस पक्षाच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. हा भव्य पक्षप्रवेश सोहळा मा. ना. चंद्रशेखरजी बावनकुळे (महसूलमंत्री) व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भाजपा व माजी आमदार राजूभाऊ पारवे यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षप्रवेश पार पडला.
पक्षप्रवेश करणारे मान्यवर:
गीतांजली नागभीडकर – सभापती, पंचायत समिती उमरेड
सुरेश लेंडे – उपसभापती, पंचायत समिती उमरेड
राहुल मसराम – उपसभापती, पंचायत समिती भिवापूर
दादाराव मांडस्कर – पंचायत समिती सदस्य, उमरेड
प्रियंका लोखंडे – पंचायत समिती सदस्य, उमरेड
भिकाजी भोयर – संचालक, बाजार समिती उमरेड
सतीश नागभीडकर,
या पक्षप्रवेशाने उमरेड व भिवापूर भागात भाजपाचे स्थान अधिक मजबूत झाले असून पक्षाच्या आगामी रणनीतीला गती मिळाली आहे. पक्षप्रवेशावेळी पदाधिकाऱ्यांनी भाजपाच्या धोरणांवर विश्वास ठेवून विकासात्मक कार्यात सहभागी होण्याची ग्वाही दिली.
मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आपल्या भाषणात पक्षप्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत करताना म्हटले की, “भाजपामध्ये सामील होणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळेल आणि विकासाच्या माध्यमातून जनसेवा करण्याचा दृढ संकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला जाईल.”
या प्रसंगी आनंदराव राऊत, गंगाधर फलके, सतीश चौधरी, उमेश हटवार, सुभाष राऊत, अनिरुद्ध चचाने, हरीश बन, आशिष चालवणकर, संजय ढोके, तुषार भगत, मयूर लांडगे व स्थानिक नेते, कार्यकर्ते, तसेच नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.