नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नॅशनल धोबी महासंघ नाशिक शहर महिला अध्यक्षपदी सौ. रेखा मोरे – समाजहितासाठी नवी दिशा

DPT NEWS NETWORK 🗞️📹🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- योगेश गवळे

नाशिक : नॅशनल धोबी महासंघाच्या वतीने सौ. रेखा भगवान मोरे यांची नाशिक शहर महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक कार्य, प्रभावी संघटन कौशल्य तसेच माध्यमांशी सुसंवाद ठेवण्याच्या क्षमतेची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली.

सौ. मोरे यांच्या निवडीमुळे नाशिक शहरातील धोबी समाजात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध सामाजिक, राजकीय आणि संस्थात्मक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

महासंघाचे पदाधिकारी यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेनुसार, सौ. रेखा मोरे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य अधिक सशक्त होईल. महिला सक्षमीकरण, शिक्षण, रोजगार निर्मिती आणि समाजातील ऐक्य वृद्धिंगत करण्यासाठी त्या महत्त्वपूर्ण उपक्रम राबवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

या नियुक्तीबद्दल नॅशनल धोबी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष मा. अनिलजी एस. मोरे आणि संघटक व प्रसिद्धी प्रमुख गुलाबराव जगन्नाथ भदाणे (जळगाव, महाराष्ट्र) यांनी सौ. मोरे यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:55 pm, April 18, 2026
40°C
घनघोर बादल
10 %
6 Km/h
Wind Gust: 11 Km/h
Clouds: 99%
Visibility: 10 km
Sunrise: 6:09 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!