नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

महाराजांच्या स्मारकावर विघ्नसंतोषींचा आघात – नाव कोरलेली पाटी फोडली

*घटनास्थळी लोखंडी सळाख, कुऱ्हाड मिळाली
*राजकीय डावाची चर्चा

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️📹 ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी अमर मोकाशी

भिवापूर, (दि.१०) :- स्थानिक आझाद चौकात उभारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक केवळ शहराचा अभिमान नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या हृदयात स्वाभिमानाचा दीप पेटवणारा केंद्रबिंदू आहे. मात्र, शनिवारी रात्री (दि.९)घडलेल्या प्रकाराने केवळ पायथ्यावरील पाटीच नव्हे तर शहराच्या मनालाही ठेच लागली!
मध्यरात्री अज्ञातांनी महाराजांच्या प्रतिमेच्या पायथ्याशी लावलेली दगडी नावफलक निर्दयपणे फोडला. सकाळी ही बाब उघडकीस येताच शहरभर संतापाची लाट उसळली. सर्वत्र एकच प्रश्न — हे कोणत्या विकृत मनोवृत्तीचे लक्षण आहे?

—> ‘वेड्याचे नाही, शहाण्याचे काम!’

घटनेनंतर सुरुवातीला हा एखाद्या वेडसराने केलेला विध्वंस असेल असा अंदाज वर्तविला गेला. पण घटनास्थळी सापडलेली लोखंडी सळाख आणि कुऱ्हाड पाहून चित्र बदलले. हे केवळ आंधळ्या रागाचे वा वेडेपणाचे कृत्य नसून, नियोजित आणि बुद्धीपूर्वक आखलेली कारवाई असल्याचे आता स्पष्ट संकेत मिळत आहेत.

—-> वर्ष २०२२२०२३ मध्ये तत्कालीन आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून आझाद चौकात महाराजांची भव्य प्रतिमा उभारण्यात आली. दगडी पायथ्याशी स्मारक उभारणीचा तपशील आणि आमदारांचे नाव कोरलेली पाटी लावण्यात आली होती. या पाटीने केवळ स्मारकाची शोभा वाढवली नाही, तर इतिहास आणि योगदानाची नोंद नागरिकांच्या मनात कायमस्वरूपी कोरली होती. आणि नेमकी हीच पाटी विघ्नसंतोषी मंडळींनी लक्ष्य केली.

—> राजकीय गंधाची चर्चा

स्मारक फोडण्यामागे केवळ विध्वंसक वृत्ती नाही, तर राजकीय वास असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. काही सुज्ञ नागरिकांचे मत — पाटीवर कोरलेले नाव मनात खुपत असलेल्या “कुण्या ‘शहाण्याने’ आपल्या हाताखालच्या माणसांना पाठवून रात्रीच्या अंधारात पाटी फोडली. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी घटनास्थळी कुऱ्हाड आणि सळाख टाकून ठेवली, जेणेकरून जनतेला आणि तपास यंत्रणेला ते ‘वेड्याचे’ काम वाटावे.”

—> तक्रार दाखल, कारवाईची मागणी

घटनेनंतर शिवसेनेचे शहर अध्यक्ष महेश डडमल यांनी तातडीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून दोषींना गजाआड करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे शहरातील शांततेला गालबोट लागले असून, नागरिकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

—> नागरिकांचा संताप

“महाराजांवरील प्रेम हे आमच्या रक्तात आहे. अशा पवित्र स्मारकावर हात घालणाऱ्यांना समाजातून उठवून टाकले पाहिजे,” असा संतप्त सूर नागरिकांच्या चर्चेतून उमटतोय. भिवापूरच्या अभिमानस्थानी झालेला हा घातपात केवळ पाटी फोडण्यापुरता मर्यादित नाही. हा एक मानसिक, राजकीय आणि सांस्कृतिक आघात आहे. आता पाहायचे इतकेच — पोलिस तपासातून खरी नावे उघडकीस येतात का, की चौकशीच्या फेऱ्यात अडकून ही केस फाईलबंद होतो.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:52 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
31 %
13 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!