DPT NEWS NETWORK 🗞️📹🗞️✍️प्रतिनिधी:- तानाजी भोकरे
आजरा : सिरसंगी, येमेकोंड परिसरातील शेती पिकात हत्तीने धुमाकूळ घातला आहे. भात व ऊस पिकाचे मोठे नुकसान सुरू आहे. यामुळे शेतकरी वन विभागाने हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी करत आहेत.
गेले पंधरा दिवस रात्री सिरसंगी येथील जंगलात वास्तव्य करत असून शिरसंगी व येमेकोंड येथील शिवारात सायंकाळी सहा नंतर धुमाकूळ घालत आहे. रात्रीचे सिरसंगी – आजरा रस्त्यावर वाहनधारकांना दर्शन देत असल्यामुळे वाहन चालकातून भीतीच्या वातावरण पसरले आहे. काही वेळा सायंकाळी पाच वाजताच हत्ती चित्कारत जंगलातून शिवारात येत असल्यामुळे शेतातील महिलांना हातातील कामे टाकून घराकडे धाव घ्यावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर शेती करायची कशी असा प्रश्न पडला आहे. वन विभागाकडून मिळणारी तुटपुंजी रक्कम आम्हाला नको पण हत्तींचा बंदोबस्त करा अशी मागणी शेतकरी करत आहेत. शिरसंगी येथील चाळू सावंत, अशोक पाटील विजय साठपे, वसंत सुतार यांच्या ऊस व भात पिकांचे नुकसान तर येमेकोंड येथील नारायण तिबीले, तानाजी कातकर , शंकर कांबळे,नामदेव कसेकर यांच्या ऊस व भात पिकांचे नुकसान हत्तीने केली आहे. नुकसानीची पाहणी वनरक्षक तानाजी कवळीकट्टीकर व तानाजी खांडेकर यांनी पाहणी करून पंचनामे करत आहेत.
सध्या नांदणी येथील महादेवी हत्तींनीचा प्रश्न चर्चेला येत असताना तालुक्यात धुमाकूळ घालत असलेल्या हत्तींना पकडून गुजरातच्या वनतारा हत्ती कल्याण केंद्रात घेऊन जावे असे मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरवर्षी आजरा तालुक्याला हत्तीकडून झालेल्या नुकसान भरपाई ही लाखो रुपये शेतकऱ्यांना दिले जाते. शासनाकडून दिली जाणारी ही नुकसान भरपाई आम्हाला नको पण धुमाकूळ घालत असलेल्या या हत्तीला गुजरातमधील वनतारा हत्ती कल्याण केंद्रात वन विभागाने व शासनाने घेऊन जावे अशी मागणी शिरसंगी व येमेकोंड येथील शेतकऱ्यांनी केली आहे. तानाजी भोकरे आजरा प्रतिनिधी



