नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

प्रा. सोनल म. वांगे (तिरकर) यांना अमरावती विद्यापीठाची पी.एच.डी. पदवी प्राप्त

DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी- मिलिंद इंगळे

अकोला:- श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय, अकोलाच्या संशोधन केंद्रावरील विद्यार्थिनी प्रा. सोनल महादेवराव वांगे (तिरकर) यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामार्फत वाणिज्य शाखेतील सर्वोच्च शैक्षणिक पदवी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पी.एच.डी.) बहाल करण्यात आली आहे. प्रा. सोनल म. वांगे सध्या श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयाच्या एम.सी.ए. विभागात कार्यरत आहेत. त्यांनी एम. टेक. आणि एम.बी.ए. ही पदव्युत्तर शिक्षणे पूर्ण केली असून, त्यांच्या शैक्षणिक प्रवासात त्यांनी सातत्याने उत्कृष्टता साधली आहे. त्यांचा पी.एच.डी. प्रबंध “ॲन ॲनालिटिकल स्टडी ऑफ हॅबिट्स ऑफ एटीएम अँड डेबिट कार्ड सर्विसेस अमंग द कस्टमर्स ऑफ नॅशनलाईज बँक्स इन अकोला डिस्ट्रिक्ट (कालावधी 2018 ते 2023)” या विषयावर आधारित आहे. त्यांना प्रा. डॉ. महेश चंद्रभान डाबरे यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले. डॉ. डाबरे सरांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत एकूण ०९ विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्राप्त झाली आहे. प्रा. सोनल म. वांगे यांनी वाणिज्य व व्यवस्थापन या विद्याशाखेअंतर्गत बिझनेस मॅनेजमेंट या विषयात संशोधन केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. जी. जी. गोंडाणे तसेच पी.एच.डी. रिसर्च सेंटरच्या समन्वयक डॉ. वर्षा सुखदेवे आणि मार्गदर्शक डॉ. महेश चं. डाबरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. प्रा. सोनल वांगे (तिरकर) यांनी त्यांच्या यशाचे श्रेय त्यांचे पालक श्री. महादेवराव व सौ. शोभा वांगे (अमरावती), सासू-सासरे श्री. महादेवराव व सौ. सुलोचना तिरकर (मूर्तिजापूर), पती प्रा. डॉ. अनिल म. तिरकर आणि मुले चि. शिवांश व कु. संस्कृती यांना दिले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:30 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!