DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी – मिलिंद इंगळे
वाशीम- चळवळकेंद्री कादंबरीच्या परंपरेत वेगळे स्थान निर्माण करणारी रंगनाथ पिराजी धांडे यांची ‘झोलांड’ कादंबरी आहे. असे झोलांड प्रकाशन समारंभ प्रसंगी फुले आंबेडकर वाड्मय कोषाचे मुख्य संपादक प्रा. डाॅ. महेंद्र भवरे यांनी प्रतिपादन केले.
‘झोलांड ‘ कादंबरीचा प्रकाशन समारंभ पत्रकार भवनात
दि.१३ सप्टेंबर रोजी सुप्रसिद्ध समीक्षक तथा फुले -आंबेडकारी विचारवंत प्रा.डाॅ. महेंद्र भवरे यांचे हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी व समीक्षक प्रा.अशोक इंगळे होते. यावेळी ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत, सुप्रसिद्ध चित्रकार श्रीधर अंभोरे, समीक्षक प्रा.डाॅ. शत्रुध्न जाधव, कवी प्राचार्य डाॅ. मिलिंद बागुल, पीरिपाचे राज्याध्यक्ष मा.गोपाळराव आटोटे गुरूजी, लेखक प्रा. रंगनाथ पिराजी धांडे आणि कवी शेषराव पिराजी धांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जगप्रसिद्ध चित्रकार श्रीधर आंभोरे यांचा सत्कार करण्यात आला. कादंबरी प्रकाशन झाल्यानंतर यावेळी कवी लोकनाथ यशवंत म्हणाले, आताच्या काळात भारतीय साहित्याला नोबल मिळत नाही यांची खंत वाटते. आपण जे जीवन जगतो तेच लेखनात अवतरलं पाहिजे. डोळ्यांने जे बघतो तेच लिहा. तेच अस्सल असतं. लेखक जे लिहितो तो त्या काळचा इतिहास असतो. म्हणून जे जगतो तेच लिहा.कवी मिलिंद बागुल म्हणाले चळवळ गतिमान होण्यासाठी लेखकांची भूमिका महत्वाची आहे.
या झोलांड कादंबरीतून
‘कार्यकर्ता जीवंत राहिला पाहिजे’ हा संदेश प्रकर्षाने जातो. कादंबरीचे भाष्यकार प्रा.डाॅ. शत्रुघ्न जाधव यांनी कादंबरीचे समीक्षणात्मक विश्लेषण केलं. या कादंबरीतला नायक राहुल हा कणखर आहे. अनेक संकटांना सामोरे जाणारा आहे. हा नायक सर्वसामान्य माणसातला आहे. मात्र त्याची निष्ठा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर अगाध आहे. औरंगाबादच्या नागसेन परीसरातून प्रेरणा घेऊन आलेला हा नायक राहुल, नायक सकारात्मक विचार करणारा आहे. चळवळीला पुन्हा उभारी देणारा नायक यात आहे. समृद्ध अशी ही कादंबरी आहे. चळवळीच्या पडझडीचा आलेख असताना यातून सकारात्मक आशेचा किरणही दिसतो आहे. कार्यक्रमाचे प्रा.डाॅ.अशोक इंगळे यांनी यावेळी बोलताना कादंबरी आशावाद पुढे घेऊन आपल्याला जायचं आहे. समाजातली मरगळ झटकली जावी. पुन्हा उठून उभा रहावा यासाठी आपण लिहितो. हाच विचार या कादंबरीतून आला आहे. या कादंबरीला वर्हाडी बोलीभाषेची झालर आहे. त्यामुळे या मातीशी इमान ठेवून आहे.
यावेळी लेखक प्रा. रंगनाथ धांडे यांचा स्थानिक संघटनांच्या वतीने कौटुंबिक सत्कार केला.
प्रास्ताविक प्रा. सुभाष अंभोरे व पाहुण्यांचा परिचय कवी महेंद्र ताजने यांनी केले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन कवी डाॅ. विजय काळे व कवी चाफेश्वर गांगवे यांनी केले. आभार कवी शेषराव धांडे यांनी मानले.



