नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात नवी मुंबईतील पत्रकारांचा जोरदार निषेध!

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️

🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी:- दिप्ती पाटील

उरण :- मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील इतर भागांत पत्रकारांवर शासकीय अधिकारी, राजकीय नेते तसेच सामाजिक आंदोलनकर्त्यांकडून होणारे गैरवर्तन आणि शारीरिक हल्ले थांबवण्यासाठी नवी मुंबईतील पत्रकारांनी जोरदार निषेध आंदोलन केले. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित झालेल्या प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियातील पत्रकार, फोटो जर्नालिस्ट, व्हिडिओ जर्नालिस्ट आणि संपादकांनी या घटनांचा तीव्र निषेध नोंदवला. आंदोलनात सहभागी झालेल्या पत्रकारांनी घोषणाबाजी करत पत्रकारांच्या हक्कांसाठी एकजुटीने आवाज बुलंद केला आहे. या आंदोलनात पत्रकार सर्वस्वी विश्वरथ नायर, सुदिप घोलप, अनंत मिस्त्री, नागमनी पांडे, राजेंद्र बोडके, सुनील तावडे, विठ्ठल दळवी, दिपक सोनवणे, सनी मेहरोल, पुरषोत्तम कनोजीया, कासीम सय्यद, फोरम जोशी, साईनाथ भोईर, सुमित रेनोसे, अथर्व रणदिवे, समीर शेख, प्रकाश शिंदे, दीपक कांबळे, फारुख सय्यद, भरतकुमार कांबळे व इतर पत्रकार उपस्थित होते.

या आंदोलनाचे नेतृत्व नवी मुंबईतील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियातील पत्रकार आणि पत्रकार संघटना यांनी केले. याप्रसंगी, “पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत. त्यांच्यावर होणारे हल्ले हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे. मुंबई, पुणे येथे अलीकडेच घडलेल्या घटा अस्वीकारार्ह आहेत. आम्ही याचा तीव्र निषेध करतो आणि सरकारकडून तात्काळ कारवाईची मागणी करतो.” असे मत मांडण्यात आले. तर, ‘पत्रकारांवर हल्ला बंद करा’, ‘प्रशासनातील पत्रकार विरोधी मानसिकता बाळगणाऱ्या अधिकाऱ्यांना निषेध असो’ अश्या घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी आंदोलकांनी सरकारला इशारा दिला की, जर पत्रकार सुरक्षेसाठीचे कठोर कायदे पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आणले गेले नाहीत, तर यापुढेही मोठे आंदोलने होणार, आंदोलनाने पत्रकार बांधवांमध्ये एकजूट दिसून आली आणि स्थानिक राजकीय नेत्यांकडूनही या मागण्या मान्य करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तर आंदोलनात सहभागी झालेल्या विविध पत्रकार संघटनांच्या सदस्यांनी सांगितले की, हे आंदोलन राज्यभरातील पत्रकारांसाठी एक संदेश आहे आणि यापुढेही हक्कांसाठी लढा सुरू राहणार आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:11 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!