नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कानशिवनी येथील बौध्द समाजावर गजानन पुंजाजी मालठाणे यांनी केली जातीवाचक शिवीगाळ

(कैक वेळा दलित अंत्यविधीला केला प्रतिबंध)

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – मिलिंद इंगळे

अकोला:- कानशिवनी येथे परंपरागत वहिवाटिकेच्या स्मशानात अंत्य संस्कार करतेवेळी गजानन पुंजाजी मालठाणे यांनी अंत्यविधी साठी प्रतिबंध केला आहे. पुन्हा जर या ठिकाणी अंत्यविधी केला तर एकाचा जीव घेईल अशी धमकी दिली, तसेच जातीवाचक घाण शिवीगाळ केली. कित्येक पिढ्यांपासून अंत्य संस्कार शेत गट नं ३५० या जागेवर केल्या जाते परंतु गजानन पुजांजी मालठाणे हा इसम बौध्द धर्माच्या प्रत्येक अंत्यविधीला अशाच अडवणूक करतो व जातीवाचक शिवीगाळ करतो.परंतु गावगाडा असल्याने अद्याप ही बौध्द समाजाने पोलिस स्टेशन मध्ये तक्रार केली नाही.तरी समाजाची सहनशीलता आता संपल्याने बोरगाव मंजू पोलिस स्टेशन मध्ये तसे समजपत्र घेण्यात आले.
या व्यक्तीवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी समाजाची मागणी होत आहे.
कैक वर्षापासुन
दलित वस्ती मध्ये अजून ही स्मशान भूमी नसल्याने बौध्द समाजाला नाहक त्रास सोसावा लागत आहे, त्यामुळे असे लज्जास्पद प्रसंग गावांमध्ये घडताना दिसत आहे, या समाजावर प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे की काय अशा प्रश्न निर्माण होत आहे.
शासनाने दलितवस्ती साठी लवकरात लवकर स्मशान भूमी ची उपाय योजना करावी अन्यथा बेमुदत उपोषण करु अशा ही इशारा बौध्द समाजाने केला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:02 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
22 %
11 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!