नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

देवस्थान जमीनीसाठी गडहिंग्लज तहसील कार्यालयावर मोर्चा

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी- संजय शेंडे


कोल्हापूर:- गडहिंग्लज तालुक्यातील देवस्थान जमीनधारकांनी आपल्या विविध मागण्यासाठी प्रांत कार्यालयापासून ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढला व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.अँड. दशरथ दळवी,कॉ. संग्राम सावंत, शिवाजी गुरव, लक्ष्मण पाच्छापुरे, अनिल उंदरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. गडहिंग्लज तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.
देवस्थान जमीनधारक सर्व शेतकऱ्यांचा विनाअट खंड भरून घेण्यात यावा, पीक पाणी नोंद करून त्याचा लिखित उतारा शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावा या मुख्य मागण्यांसह इतर मागण्यासाठी आज देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांनी गडहिंग्लज तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. तर आजरा तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले.
सदर आंदोलन अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली पार पडले. मोर्चाचे नेतृत्व मुक्ती संघर्ष समितीचे राजाध्यक्ष संग्राम सावंत, कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी केले. या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांच्याकडे परंपरेने चालत आलेल्या जमिनीला वारसा हक्काने नोंदी 7/12 पत्रकी होणे गरजेचे आहे. तसेच काही शेतकऱ्यांच्या 7/12 पत्रकातील मालकी हक्काला परंपरागत नावे होती. ती इतर हक्कात घालण्यात आली आहेत. ती चुकीच्या पद्धतीने घातली आहेत त्यामुळे पूर्वीप्रमाणे मालकी हक्कात घालण्यात यावी. तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कार्यालयाच्या अखत्यारित असणाऱ्या शेतकऱ्यांचे वेळेत खंड भरून घेण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जाते. तो खंड वेळेत भरून घेण्यात यावा. इतर हक्कात नोंदी असल्याने किंवा अन्य कारणाने पीक पाणी नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांची ऑनलाइन होत नाही. ती नोंद पूर्वीप्रमाणे घालून तसा 7/12 उतारा मिळावा. तसेच देवस्थान जमीन कसणाऱ्यांच्या नावे मालकी हक्काने देण्यात यावी. कसेल त्याची जमीन या कायद्याच्या आधारे करावी. इतर काही राज्यांमध्ये शेतकऱ्यांना कायम मालकी हक्काने देण्यात आले आहेत त्या धर्तीवर अंमलबजावणी महाराष्ट्रात व्हावी.यासारख्या अन्य विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
या आंदोलनात प्रा. सुभाष जाधव, कॉ. संग्राम सावंत, दशरथ दळवी कॉ. शिवाजी गुरव, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, लक्ष्मण पाच्छापुरे, संभाजी मोहिते, तानाजी यादव, सुभाष शिंदे, भगवान सूर्यवंशी, प्रवीण मुळीक, बाळू मांगले, शिवाजी बिरजे, परशुराम जाधव-सरकार, सुरेश जाधव यांच्यासह देवस्थान जमीनधारक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:27 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!