(शेतकऱ्याच्या शेतावर सरकारचा दरोडा…)
DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी- मिलिंद इंगळे
अकोला :- मुस्तफापूर दालंबी साठवण तलाव जी. अकोला येथील मृद व जलसंधारण विभागाने शेतकऱ्याची जमीन कुठलाही मोबदला न देता शासनाच्या नावावर करण्यात आली. मागील वर्षी पूर्ण जमिनीत व घरात पाणी आल्यामुळे जमीन व घर सरळ खरेदीने खरेदी करण्याचे प्रशासकीय विभागाने ठरविले व उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी अकोला यांनी भू. प्र. क्र. LAQ/47/ मौजा मुस्तफापूर /08/2023-24 करिता अंतिम मोबदला निश्चित्ती पत्रक दी. 24/03/2025 रोजी जिल्हास्तरीय मोबदला समितीकडून मंजूर करण्यात आला होता. परंतु मोबदला न देता महाराष्ट्र जल संधारण महामंडळ औरंगाबाद तर्फे जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग अकोला यांच्या नावे 7/12 केला आहे. आमच्या कुटूंबावर अन्याय झालेला आहे. दाळंबी साठवण तलावाच्या पाण्याची लेवल ही चुकीच्या पद्धतीने काढण्यात आली आहे. जमिनीचा सर्वे सुद्धा चुकीचा पद्धतीने केला आहे. संपादित जमीनिच्या व्यतिरिक्त 18 ते 20 शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेले आहे.
शेतात जाण्यासाठी रस्त्या सुद्धा चुकीच्या पद्धतीने बनविला आहे. रस्त्यावर 3 ते4 फूट पाणी आहे. संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा रस्त्याचे काम पूर्ण केले नाही.
शासनाने सातबारा शासनाच्या नावे केलेल्या जमिनीचा मोबदला त्वरित देण्यात यावा. शेतातील पिकाचे 2 वर्षाची नुकसान भरपाई ताबडतोब देण्यात यावी.
पाण्याखालील जमीन लवकरात लवकर संपादित करून मोबदला देण्यात यावा. तसे न झाल्यास
आम्हाला शासन प्रशासनाने सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी देण्यात यावी. वरील विषयाची दखल न घेतल्यास दि.25/9/2025 रोजी दाळंबी साठवण तलावात जलसमाधी आंदोलन करण्यात येईल. यावेळी भगवान किसनराव पंडित यांच्यासह, पांडुरंग पंडित, ज्ञानेश्वर पंडित, जगदीश पंडीत, धनराज पंडीत,अरुण पंडित, राजू महल्ले, देविदास खंडारे, बळीराम इंगळे, रवींद्र वाघमारे, देवालाल इंगळे, निलेश वानखडे, सतीष ठाकरे, सतिष महल्ले, गजानन चक्रनारायण, बाळू चक्रनारायण, जीवन पंडित, इंदुबाई वाघमारे, शारदा पंडित, कल्पना पंडित, चंद्रकला इंगळे व बिमोद मुधाने, नंदू कांबळे, मनोज कांबळे, प्रशिक पंडित यावेळी हजर होते.