DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी- मिलिंद इंगळे
अकोला:- मूर्तिजापूर शहरातील श्रीराम नगर येथे प्रज्ञा दीप बुध्दविहार परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिस्मारकाचे बांधकाम सुरु आहे. सदर बांधकाम भंते सारीपुत्र यांच्या अथक परिश्रमातून आणि लोकवर्गणीतून साकार होत आहे. काल भंते सारीपुत्र यांचा 72 वा वाढदिवस साजरा करत असताना आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष माननीय दादासाहेब वाकोडे यांनी असे मत प्रतिपादन केले की, मध्यम शेगावकर गुरुजी यांनी भंते सारीपुत्र यांना दिलेला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी
जतन करण्यासाठी, अस्थिस्मारक निर्माण होत आहे. हे स्मारक समाजाला प्रेरक आणि दिशादर्शक ठरेल. या बांधकामा करीता जनतेने तन, मन, धनाने मदत करावी.
यावेळी भन्ते सारीपुत्त पुराश्रमीचे धम्म प्रचारक संभाजी शिरसाट यांच्या जीवन कर्तृत्वावर प्रकाश टाकणारे संघनायक संभाजी सिरसाट यांचा जीवन संघर्ष या प्रेरक पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रेरक पुस्तक सुप्रसिद्ध गझलकार व लेखिका सौ सुनीताताई इंगळे यांनी केले. यावेळी भन्ते सारीपुत्त यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांतून प्रेरित होऊन गेली पन्नास वर्ष धम्म प्रचाराचे कार्य केले. समाजासाठी खूप हालअपेष्ठा सहन करून, प्रसंगी उपासमार सहन करून अविरत कार्य केले. संभाजी सिरसाठ यांना त्यांची पत्नी सौ. उषा सिरसाठ यांची मोलाची साथ मिळाली.
आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत. माझ्या कुटुंबाची सर्व जबाबदारी उषाबाईनीं घेतली, त्यामुळेच मी धम्म प्रचाराचे कार्य करू शकलो. असे मत समाज भूषण संभाजी सिरसाठ यांनी व्यक्त केले.
पुस्तक प्रकाशनानंतर लेखिका सुनीता इंगळे यांनी संगनायक संभाजी शिरसाट यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत आपले प्रेरक मत व्यक्त केले. संभाजींचे कार्य सदैव समाजासाठी प्रेरणादायक राहील असे त्या म्हणाल्या. यानंतर सुप्रसिद्ध विचारवंत रमेशभाई भोजने यांनी संभाजी शिरसाठ यांच्या कार्यावर भाष्य करत उपस्थित समुदयास मार्गदर्शन केले.
पूज्य धम्मगुरु भन्ते उपाली महास्थवीर यवतमाळ यांनी उपासक उपासिका यांना त्रिसरण पंचशील देऊन कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.
रमाई उपासिका संघ अनभोरा यांनी बुध्दपूजा सादर केला.
आयु. देवराव खंडारे सचिव बौध्द सेवा संघ यांनी लोक वर्गणी व झालेला खर्च याचा हिशोब सादर करून लोकांनी सढळ हाताने दान करावे असे आवाहन केले. यावेळी प्रा. मिलिंद वानखडे यांनी व प्रा. डॉ. राजकन्या खनखने यांनी समयोचित विचार प्रतिपादन केले. कार्यक्रमाला मूर्तिजापूर, सिरसो, चिखली, कादवी, विरहित, बडनेरा येथील उपासिका संघ व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता विश्वदीप शिरसाट, संघ दर्शन शिरसाट, विठ्ठलराव उमाळे, दिवाकर खिराळे, सतीश खंडारे, बाबूलाल खंडारे आदींनी अथक परिश्रम केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नारायण राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन बुद्धघोष तायडे यांनी केले.



