DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी मिलिंद इंगळे
अकोला – मुर्तिजापूर मधील लक्ष्मीबाई देशमुख शासकीय उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र नेमाडे यांच्या मिसेस अकोल्याच्या दंतशल्य चिकित्सक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. वर्षा राजेंद्र नेमाडे यांना वैद्यकिय क्षेत्रातील त्यांनी केलेल्या भरीव कामगिरी बद्दल त्यांच्या विविध कार्याचा गौरव म्हणून ‘मेडिको प्राईड ऑफ महाराष्ट्र ‘ या अवार्ड ने सन्मानित करण्यात आले.
अमरावती येथे पूनम प्रॉडक्शन ने आयोजित केलेल्या ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र सिजन-४’ च्या भव्य व शानदार कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध भागातून स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. किड्स, टिन, मिस, मिस्टर, मिसेस व मेडिको अशा विविध कॅटेगरीमध्ये स्पर्धा विभागली गेली होती.
किडस् कॅटेगरीमध्ये तन्वेषा गवई विनर ठरली तर रिदम नेमाडे याने पर्सनॅलिटी किड म्हणून पुरस्कार पटकावला या स्पर्धेस परिक्षक म्हणून डॉ गणेश व्यवहारे, डॉ एलिझा ( मिस वर्ल्ड ॲन्ड युनिवर्स), वैशाली भगत( मिस महाराष्ट्र), गगनदिप सिंग( मिस्टर इंडिया) यांनी काम पाहिले.
तारक मेहता का उलटा चष्मा फेम ‘चकोरी’ म्हणजेच स्वाती शर्मा या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी होत्या.



