नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

निलेश कवडे यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – मिलिंद इंगळे

मुंबई (दिनांक २५ सप्टेंबर) :
महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२४-२५ (राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार) सोमवार दिनांक २२/०९/२०२५ रोजी टाटा सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, मरीन ड्राईव्ह मुंबई येथे मा.ना.श्री. अजित पवार उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते, मा. ऍड. राहुल नार्वेकर अध्यक्ष, विधानसभा महाराष्ट्र, मा.ना.श्री. दादाजी भुसे मंत्री, शालेय शिक्षण, डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री, शालेय शिक्षण, मा.श्री. रनजीतसिंग देओल (भा.प्र.से.) प्रधान सचिव, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मा.श्री. सचिन्द्रप्रताप सिंह (भा.प्र.से.) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे, मा.श्री. महेश पालकर, शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे), मा. अनुराधा ओक (संचालक बालभारती), मा. कृष्णकुमार पाटील (शिक्षण संचालक योजना) यांच्या उपस्थितीत निलेश श्रीकृष्ण कवडे यांना सपत्नीक प्रदान करण्यात आला. निलेश कवडे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी जलम पंचायत समिती अकोला येथे सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहेत. शाळास्तरावर नवोपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी विविध शैक्षणिक प्रयोग यशस्वी केले आहेत. अध्ययन अध्यापन प्रक्रिया जास्तीत जास्त विद्यार्थ्याभिमुख करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची आवड लागण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. डिजिटल स्कूल, ई लर्निंग, कृती आधारित शिक्षण, गट पद्धत, स्वाध्याय कार्ड, माझी स्वच्छ सुंदर आणि हिरवी शाळा आणि इतर सहशालेय उपक्रम त्यांनी विशेष करून राबविले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, चित्रकला, वक्तृत्व आणि निबंध अशा विविध स्पर्धेत त्यांचे विद्यार्थी सहभागी होत असतात. पथनाट्याच्या माध्यमातून समाज जनजागृतीत त्यांची शाळा अग्रेसर राहिली आहे. समाज सहभागातून शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करत त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी जलमचा चेहरामोहरा बदलला आहे. राज्यस्तरावर बालभारतीच्या बाल वाटिका एक, दोन, तीन, इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी द्वितीय भाषा मराठी भाषा समिती सदस्य म्हणून पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये त्यांचे योगदान आहे. जिल्हा स्तरावर तज्ञ सुलभक म्हणून शिक्षक प्रशिक्षनाठी ते सक्रीय आहेत. शैक्षणिक विषयावर त्यांचे स्तंभ लिखाण सुरु आहे. निलेश कवडे हे साहित्यिक म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:47 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
21 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!