नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सिन्नर तालुक्यात बेकायदेशीर गॅस रिफिलींगवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा – ४३ गॅस सिलेंडर व साहित्य जप्त

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी योगेश गवळे

सिन्नर :- नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील अवैध व्यावसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने सिन्नर तालुक्यात मोठी कारवाई केली आहे.
दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी वावी पोलीस ठाणे हद्दीतील दोडी गाव परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यापारी वापरासाठी बेकायदेशीररीत्या गॅस रिफिलींग करणाऱ्या सेंटरवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत ४३ गॅस सिलेंडर तसेच गॅस रिफिलींगसाठी वापरण्यात येणारी साधनसामग्री जप्त करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दोडी शिवारात काही इसम घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यापारी वापरासाठी निळ्या रंगाच्या सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरण्याचे काम करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता, रामदास सुकदेव केदार (वय ५०) आणि कैलास अर्जुन केदार, दोघेही रा. दोडी, ता. सिन्नर हे गॅस रिफिलींग करताना आढळून आले.
या दोघांविरुद्ध वावी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३५६/२०२५ व ३५७/२०२५ भा.दं.वि. कलम २८७, २८८, ३(५) सह जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कारवाईदरम्यान एकूण ३५ घरगुती गॅस सिलेंडर, ०८ व्यापारी (निळ्या रंगाचे) सिलेंडर, २ पिस्टन पंप, इलेक्ट्रीक मोटर, वजनकाटा, आणि गॅस टाकीचे प्लॅस्टिक सिल असा ₹१,७५,४००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, वावी पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश शिंदे, पोउनि सुदर्शन बोडके व अंमलदार विनोद टिळे, सतिष घुटे, दिपक गुंजाळ, आबा पिसाळ, माधव साळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने केली.
👉 स्थानिक गुन्हे शाखेची ही कारवाई अवैध गॅस रिफिलींग व्यवसायावर मोठा आघात मानला जात असून, ग्रामीण भागात अशा प्रकारच्या धोकादायक कृतींना आळा बसण्यास मदत होईल.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!