नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अवैध दारू धंद्यावर मालेगावात मोठी पोलिसांची धडक कारवाई! १६ इसमांविरुद्ध गुन्हे दाखल – २८ हातभट्टी नष्ट, १६,८०० लिटर रसायन व ८० लिटर गावठी दारू नष्ट

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी योगेश गवळे

मालेगाव:- मा. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांच्या आदेशानुसार व मा. श्री. तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुका व वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे हद्दीत अवैध हातभट्टी व गावठी दारूच्या व्यवसायावर दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी विशेष पथकाने संयुक्त छापा टाकून मोठी कारवाई केली.
या कारवाईत एकूण २८ हातभट्टी नष्ट करण्यात आल्या असून १६,८०० लिटर गावठी दारू तयार करण्याचे रसायन व ८० लिटर तयार गावठी दारू जप्त व नष्ट करण्यात आली. तसेच १६ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे हद्दीतील कारवाईत अंजग, वडेल, सिंधबन वडेल, खाकुर्डी, काष्टी, रावळगांव व गाळणे या गावांमध्ये एकूण ९ कारवाया करण्यात आल्या. यात सुमारे ९,२०० लिटर रसायन व ८० लिटर तयार दारू नष्ट करून अंदाजे ३.३० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तर मालेगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत बंधारपाडे, पाटणे, चिंचावड, येसगांव, गिलाणे या गावांमध्ये एकूण ११ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या ठिकाणांहून सुमारे ७,६०० लिटर रसायन नष्ट करून ३.८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही पोलीस ठाण्यांत मिळून १६ इसमांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणेस ११ व मालेगाव तालुका पोलीस ठाणेस ५ गुन्हे दाखल झाले आहेत.
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व मा. अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पो.अं. सचिन बेदाडे, दिनेश शेरावते, अक्षय चौधरी, राकेश जाधव, राम निसाळ, प्रशांत बागुल व निवृत्ती काळे यांचा समावेश होता.
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारूधंदे करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:56 pm, June 8, 2026
33°C
घनघोर बादल
45 %
39 Km/h
Wind Gust: 43 Km/h
Clouds: 87%
Visibility: 10 km
Sunrise: 5:49 am
Sunset: 7:10 pm
Translate »
error: Content is protected !!